विधानसभा उपाध्यक्ष निवडणूक : शिवसेनेच्या विजय औटी यांची बिनविरोध निवड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – २०१४ साली विधानसभेची निवडणूक झाल्यापासून रिक्त ठेवण्यात आलेल्या विधानसभेचे उपाध्यक्ष पदी आता शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची निवड झाली आहे. नाराज शिवसेनेला या पदाची बोळवण करून खुश करण्याचा इरादा भाजपचा होता त्यावर आज शिक्का मोर्तब झाले असून येत्या काळात युतीच्या प्रेमाला बहर येण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी आज ३० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार होते. परंतु निवडणुकीसाठी काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दाखल केलेले अर्ज त्यांनी काढून घेतल्याने हि निवडणूक बिन विरोध झाली आहे. निवड होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विजय औटी यांना सन्मानपूर्वक आपल्या आसनावर नेवून बसवले.

२९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटा पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यावेळेत काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ ,शिवसेनेचे विजय औटी आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० पर्यंत आपले उमेदवारी मागे घ्यायची मुदत होती तेव्हा सपकाळ आणि बच्चू कडू यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने विजय औटी हे बिनविरोध उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.

शिवसेना आणि भाजप युतीच्या सरकारात भाजपचे आमदार अधीक असल्याने अध्यक्ष पद भाजपला मिळणे सहाजिक होते परंतु उपाध्यक्ष पद रिक्त ठेवून शिवसेनेला शह देण्याचा भाजपने डाव आखला होता. परंतु शिवसेना भाजप पासून दुरावत चालली आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी चांगलीच कामाला लागली असताना भाजपला हि आगामी निवडणुकीत युती महत्वाची वाटू लागली आहे म्हणून भाजप सध्या शिवसेने सोबत जुळवून घेण्याच्या पवित्र्यात आहे. युतीच्या जवळकीचे  पहिले पाऊल म्हणून विधानसभेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे पाहिले जात होते. आज विजय औटी यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याने शिवसेना भाजप युतीची समीकरणे येत्या काळात बघायला मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे.

कोण आहेत विजय औटी 
१९७५ पासून विद्यार्थी चळवळीत घेतली उडी
१९७७ साली झालेल्या कामगार संपाला पाठींबा दिल्याने ७ दिवसांचा तुरुंगवास त्यांना भोगावा लागला.
१९७८ साली दुष्काळी  विद्यार्थ्यांची फी सरकारने भरावी म्हणून पारनेर तहसील कचेरीत शिक्षण राज्य मंत्र्यांना घेराव घालण्याचे आंदोलन यशस्वी आणि राज्य शासनाने मुख्यमंत्री निधीतून भरली विद्यार्थ्यांची फी.
१९८५ साली पहिली विधानसभा निवडणूक फक्त  २२०० मतांनी विजयाने दिली हुलकावणी
२००० रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीवर सदस्य म्हणून नियुक्ती
२००२ साली जिल्हा परिषद निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर जिंकली
२००४ मध्ये शिवसेनेतून विधानसभेवर निवड
२००८ साली पारनेर विधानसभा मतदार संघ  फेर रचनेत गायब झालेला पुन्हा अस्तित्वात आणण्यात यश
२००९ विधानसभेत शिवसेनेतून विजयी
२०१४ विधानसभेवर शिवसेनेतून विजयी
आज ३० नोव्हेंबर २०१८ रोजी विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड.

२ हजाराच्या नव्या नोटा बंद होणार ?