पुण्याजवळ शिवशाही बस सह ४ खासगी बसला भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सातारा रस्त्यावर शिंदेवाडी येथे एका गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसला आज सकाळी आग लागली. शिवशाही बससोबत उभ्या असलेल्या इतर ३ ते ४ खासगी बसणेही पेट घेतला आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सातारा रस्त्यावर शिंदे वाडी येथे गॅरेज आहे. या गॅरेज मध्ये नेहमी बसेस दुरुस्तीच्या कामासाठी उभ्या असतात. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास येथे असलेल्या एका बसला आग लागली. प्राथमिक माहितीनुसार या आगीत उभ्या असलेल्या दोन शिवशाही बस जळाल्या आहेत. तर इतर ३ ते ४ बस पेटल्या आहेत. अग्नीशमन दलाला याची माहिती मिळताच ३ फायर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

You might also like