धक्कादायक ! भांडणानंतर त्यानं चक्क बायकोचं शिर कापलं, अन्…

बांदा : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्यात असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीनं पत्नीची हत्या केली आहे. धक्कादायक बाब अशी की पत्नीचं शीर धडापासून वेगळं करून ते शीर घेऊन तो पोलीस ठाण्यात पोहोचला. हे पाहून पोलीसही चक्रावले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. उत्तर प्रेदशच्या बादा जिल्ह्यात आज सकाळी ही धक्कादायक घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिन्नार यादव असं या आरोपीचं नाव आहे. पती-पत्नींमधील किरकोळ भांडणातून हा प्रकार घडल्याचं प्रथमदर्शनी सांगण्यात आलं आहे. बांदा जिल्ह्यातील नेता नगर या ठिकाणी सकाळी 7.30 वाजता पत्नी विमला (वय 35) सोबत पतीचं भांडण झालं. किरकोळ वादात रागाच्या भरात पती चिन्नारनं धारदार शस्त्रानं पत्नी विमलाचं शीर धडापासून वेगळं केलं. त्यानंतर यांतर तो शीर घेऊन जवळ असणाऱ्या बाबेरू पोलीस ठाण्यात गेला आणि स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र प्रतापसिंह चौहान यांनी दिली.

पत्नीचं शीर हातात घेऊन जाताना या पतीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी चिन्नार यादव याला अटक केली आहे. हत्येसाठी वापरलेलं शस्त्रही पोलिसांनी जप्त केलं आहे. तसंच मृत महिलेचं शरीर फॉरेंसिग लॅबकडे पाठवण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.