धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर ‘दुसऱ्यांदा’ सामुहिक बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबादमधील महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आले आणि त्या प्रकरणावर अजून वाद सुरू असतानाच दिल्लीच्या शेजारच्या राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली. हैदराबादनंतर बिहारच्या बक्सर आणि समस्तीपूरमध्ये बलात्कारानंतर पिडीतेला जाळून टाकण्याच्या धक्कादायक घटना घडल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी दरभंगा येथे एका टेम्पो चालकाने पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केला. अशा रोजमितीला देशभरातून बलात्काराच्या अनेक घटना समोर येत आहेत.

तसेच अजून एक अंगावर काटे आणणारी घटना म्हणजे उन्नावमध्ये वर्षभरापूर्वी झालेला बलात्कार. या बलात्कारात पीडित महिलेचा आज पहाटे मृत्यू झाला. गुरुवारी ती या प्रकरणी न्यायालयात जात असताना जामीनावर सुटलेल्या आरोपीने तिला मारहाण करून अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले होते. महिला जवळपास ९० % जळाल्याने तिला कालच दिल्लीला हलविण्यात आले होते. दरम्यान, तिचे वाचणे हे कठीण होते. पिडीतेच्या कुटुंबाने या नराधमांना ठार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि देशातील जनतेचीही हीच भावना आहे. हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरला देशभरातून पाठिंबा मिळाला आहे. आणि पोलिसांचे देशभरात कौतुक देखील होताना दिसतेय. तर काही बुद्धजीवी वर्गाकडून या प्रकरणाचा विरोध देखील होत आहे.

या सर्व प्रकरणानंतर बलात्काराची अजून एक घटना समोर आली आहे. नुकतीच या सगळ्या प्रकरणांना दुजोरा देणारी घटना आज हरियाणामध्ये घडली. हरियाणातील पालवालमध्ये एका १७ वर्षीय मुलीवर ५ डिसेंबरला दुसऱ्यांदा सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अल्पवयीन मुलीवर ऑगस्ट महिन्यामध्ये सामुहिक बलात्कार झाला होता. यानंतर देखील पुन्हा तीच्यावर दुसऱ्यांदा सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली.

गेल्या ऑगस्ट महिन्यात चार जणांनी मिळून अपहरण केले आणि सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार मुलीने दाखल केली होती. पुन्हा त्याच बलात्काऱ्यांनी अपहरण करून पुन्हा सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. पलवाल पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे ४ डिसेंबरला अपहरण करण्यात आले असून तक्रारीनंतर या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींचा तपास देखील चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

Visit : Policenama.com