खळबळजनक ! पत्नीच्या खुनाची भोगत होता शिक्षा, ‘पॅरोल’वर सुटल्यावर केलं ‘असं’ काही

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – चार वर्षापूर्वी पत्नीचा खून केल्याच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगणाऱ्या आरोपी पती पॅरोलवर गावी आला होता. गावी आल्यानंतर आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबजनक घटना समोर आली आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे घडली आहे. भरत ताराचंद पवार असं आत्महत्या करणाऱ्या कैद्याचं नाव आहे.

भरत पवार हा पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात होता. एक महिन्यापूर्वी तो पॅरोलवर आला होता. दोन दिवसांनंतर भरतची पॅरोल संपणार होती. मात्र, रविवारी (दि.26) दुपारी दोनच्या सुमारास त्यांन झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्याने चार वर्षापूर्वी पत्नीचा खून केल्याप्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत होता. दोन दिवसांनी त्याची पॅरोलची मुदत संपणार होती. नंतर तो औरंगाबाद येथील हर्सुल तुरुंगात परत जाणार होता.

मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील जातेगाव तांडा येथील भरत ताराचंद पवार याने कॅनलच्या शेजारी असलेल्या उंबराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मागील दोन दिवसांपासून तो मानसिक तणावता होता. याच नैराश्येतून त्याने आत्महत्या केली असल्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात तलवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.