धक्कादायक… बहिणीने भावाला दिली वडिलांच्या खुनाची सुपारी

नांदुर्गा (लातूर)  : पोलीसनामा ऑनलाईन

जन्मदात्या पित्याच्या खुनाची सुपारी मुलीनेच दिली. ही सुपारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला न देता आपल्या सख्ख्या भावालाच दिली. भावाने देखील तीन लाखांसाठी पत्नीच्या मदतीने पित्याच्या डोक्यात दगड घालून खुन केला. खुन केल्यानंतर आत्महत्या असल्याचे भासवण्यासाठी मृतदेह विहरीत फेकून दिला. मात्र किल्लारी पोलिसांनी केलेल्या तपासात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १४ सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास घडला होता. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e27808bb-c0b9-11e8-9c84-6d9b14488a99′]

नामदेव माळी असे खुन झालेल्या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. तर बालाजी नामदेव माळी (वय -३९) आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली असून खुनाची सुपारी देणाऱ्या गंगुबाई ऊर्फ रोहीणी अविनाश माळी (वय ३५) हिच्यासह आणखी एका महिलेला मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी मिळाली.

[amazon_link asins=’B07B4KWVK1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e96d3069-c0b9-11e8-b5c8-e30f5318b143′]

औसा तालुक्यातील किल्लारी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या संक्राळ येथील बालाजी आणि त्याच्या पत्नीने खुन नामदेव माळी यांचा डोक्यात दगड घालून खुन केला. दुपारी चारच्या सुमारास नामदेव माळी झोपले असताना या दोघांनी डोक्यात दगड घालून खून केला. आरोपींनी रात्री नामदेव माळी यांचा मृतदेह गावाजवळच्या विहिरीत फेकून दिला. वडिलांनी आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केली असल्याचा बनाव केला. किल्लारी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यावेळी पोलिसांना काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्या. त्यामध्ये मृत व्यक्तीच्या चप्पला त्याच्यासोबत नसून त्या घरी होत्या. तसेच मृत व्यक्तीच्या डोक्यावरील टोपी त्याच्या कमरेला रक्ताने माखलेली होती. त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालामध्ये मृत व्यक्तीच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला.

सर्जिकल स्ट्राइकचे हिरो संदीप सिंग यांना वीरमरण 

पोलिसांनी बालाजी माळी व त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र चौकशीला ते दोघे प्रतिसाद देत नसल्याने पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवला. पोलीस खाक्या दाखवताच या दोघांनी गुन्हा कबुल केला. पोलिसांनी या दोघांना न्यायालयात हजर करुन पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत दोघांना पोलीस कोठडी सुनावली.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ff9e57c9-c0b9-11e8-bdc6-534e54d09d7e’]

पोलिसांनी पोलीस कोठडीत आरोपींकडे चौकशी केली. चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली. आरोपींनी सुपारी घेऊन जन्मदात्या पित्याचा खून केला. तसेच हि सुपारी दुसऱ्या कोणी नाही तर मृत नामदेव माळी यांच्या मुंबई येथील मुलीने तीन लाखांची सुपारी भावाला दिल्याची माहिती समोर आली.

मालदीवला चीनपासून मिळणार मुक्ती ? 

हा प्रकार समोर आल्यानंतर किल्लारी पोलिसांचे एक पथक मुंबईला पाठवण्यात आले. किल्लारी पोलिसांनी मुंबईतील डोंबिवली येथे वास्तव्यास असलेल्या गंगुबाई ऊर्फ रोहीणी अविनाश माळी हिच्यासह तिच्याच घरात राहणाऱ्या संक्राळ येथील एका मुलीला ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच भाऊ बालाजी माळी याला वडिलांना मारण्यासाठी सुपारी दिल्याचे गंगुबाई ऊर्फ रोहीणी माळी यांनी कबुल केले. सहायक पोलीस उप निरीक्षक कामत यांनी औसा पोलीस उपअधिक्षक गणेश किद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश यादव यांच्यासह केवळ सहा ते सात दिवसांच्या आत गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकीस आणला. तसेच आरोपींच्या मुसक्या आवळल्या.