धक्कादायक… वाकड आणि भोसरी एमआयडीसीत लैंगिक अत्याचाराच्या घटना

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन  – पिंपरी-चिंचवड शहरातील महिला आणि अल्पवयीन मुली वासनेच्या बळी पडत आहेत. गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसात वाकड आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे दोन प्रकार घडले असून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. सोलापूर येथे राहणाऱ्या १८ वर्षीय प्रताप भाऊराव शिंदे याने पीडित १० वर्षाची मुलगी घरात एकटी असताना त्याचा गैरफायदा घेतला. घरात जाऊन, आतून कडी लावून, तिच्या सोबत लैंगिक अत्याचार केले. ही घटना गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नाचे अमिष दाखवुन १७ वर्षीय मुलीसोबत एक वर्षात वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी सोमेश्वर गव्हाण (२५, रा. परभणी) याला अटक केली आहे. तर पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. सोमेश्वर याने पीडित मुलीला बाहेर फिरायला नेऊन, तिच्यासोबत अत्याचार केले. तसेच वेळोवेळी त्याच्या रूमवर नेऊनही अत्याचार केले. मुलगी गर्भवती राहील म्हणून जबरदस्तीने तिला गर्भ निराधक गोळ्या खायला दिल्या. तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.