Shyam Global Technoventures | श्याम ग्लोबल टेक्नोव्हेंचर्स प्रा. लि. (ओईएम, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड) द्वारे पुण्यात नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – श्याम ग्लोबल टेक्नोव्हेंचर्स प्रा. लि. (Shyam Global Technoventures) (एसजीटीपीएल – SGTPL) ही महिंद्रा अॅण्ड महिंद्रा लिमिटेडची (Mahindra & Mahindra Limited) मूळ उपकरण उत्पादक (ओईएम-OEM) आहे. कंपनीने अलीकडेच पुण्यात नवीन उत्पादन सुविधा सुरू करून आपल्या कार्याचा विस्तार केला आहे. श्याम ग्लोबल टेक्नोव्हेंचर्स प्रा. लिमिटेडचा (Shyam Global Technoventures) प्लांट आणि मुख्यालय पुणे येथे आणि ब्रांच ऑफिस मुंबई येथे आहे. एसजीटीपीएलने जागतिक दर्जाच्या जेन सेट्सचे (Jane Sets) उत्पादन करणारा अत्याधुनिक प्लांट तयार केला आहे. जेथे उच्च उत्पादकतेसाठी उत्तम इंधन व्यवस्था, एक्झॉस्ट एमिशन्स (Exhaust Emissions) आवश्यक असते, एसजीटीपीएलकडे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारे आणि स्पेक्ट्रम उद्योगातील मोठ्या गरजा पूर्ण करणारे जेन सेट आहेत.

 

ही कंपनी दीर्घकाळ चालणारे आणि कमी देखभालीसह उच्च दर्जाचे, लो मेंटनन्स जनरेटर तयार करते. महिंद्रा पॉवरॉलचा वापर बांधकाम क्षेत्रात, हॉस्पिटल (Hospital), इंडस्ट्री (Industry), स्कूल (School), पेट्रोल पंप (Petrol Pump), टेलिकॉम (Telecom), क्रशिंग उद्योगात (Crushing Industry) केला जातो. या नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन हेमंत सिक्का Hemant Sikka (अध्यक्ष, एफईएस, पॉवरॉल बिझनेस महिंद्रा अँड महिंद्रा) यांनी केले. संजय जैन Sanjay Jain (बिझनेस हेड, पॉवरोल) नरेंद्र गोयल Narendra Goyal (संचालक, श्याम ग्लोबल टेक्नोव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड) आणि महिंद्राचे इतर प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांना संबोधित करताना नरेंद्र गोयल म्हणाले, श्याम ग्लोबल (Shyam Global Technoventure) गेल्या 4 वर्षांपासून ग्राहकांच्या हितासाठी काम करत आहे. पुण्यातील आमच्या विस्तारानंतर आम्ही पुढे देखील आणखी विस्तार करू. माला विश्वास आहे की भविष्यात जेनसेटची मागणी वाढेल जी नागरिक आणि व्यवसाय दोघांसाठीही फायद्याची ठरेल.

पुढे त्यांनी श्याम ग्लोबलच्या सर्व सदस्यांचे त्यांच्या मेहनतीसाठी आणि समर्पणासाठी कौतुक केले. महिंद्रा पॉवरॉलच्या (Mahindra Powerol) सर्वात मोठ्या ओईएम पैकी एक म्हणून, श्याम ग्लोबल (Shyam Global Technoventure) सतत प्रगती करत आहे आणि वेगाने विस्तारत आहे, आणि पुढेही ते वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये ग्राहकांना सेवा देत राहतील. कंपनीची स्थापना एप्रिल 2018 मध्ये झाली असुन नरेंद्र गोयल आणि रुची गोयल हे श्याम ग्लोबल टेक्नोवेटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि संचालक आहेत, त्यांना मार्केटिंग-स्ट्रॅटेजी (Marketing-Strategy) आणि कंपनीसाठी दीर्घकालीन योजनांचा भरपूर अनुभव होता.

 

ते अभियांत्रिकीचे पदवीधर असून त्यांनी व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
एसजीटीपीएल श्याम ग्लोबल टेक्नोव्हेंचर्स सुरू करण्यापूर्वी,
त्यांनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड सारख्या प्रमुख कॉर्पोरेट क्षेत्रात 25 वर्षांहून अधिक काळ वरिष्ठ स्तरावर काम केले.
आपल्या मेहनतीच्या आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी या कंपनीला आज यशाच्या शिखरावर नेले आहे.
पुढे नरेंद्र गोयल म्हणतात, आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की ईटी बिजनेस अवार्ड २०२१ मध्ये
श्याम ग्लोबलला औद्योगिक क्षेत्रातील एक उदयोन्मुख उद्योजक म्हणून मान्यता मिळाली आहे.

 

Web Title :- Shyam Global Technoventures | The new manufacturing facility by
Shyam Global Technoventures Private Limited (OEM Mahindra & Mahindra Limited) Inaugurated in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा