अमेरिकन ‘सिंगर’ बॉबी ब्राऊनच्या मुलाचं निधन ! पत्नी अन् मुलीचा बाथटबमध्ये बुडून झाला होता मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकन सिंगर बॉबी ब्राऊन (Bobby Brown) याच्या 28 वर्षीय मुलाचं निधन झालं आहे. लॉस एंजेलिस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी बॉबीच्या मुलाचा मृतदेह लॉस एंजेलिसमधील घरात आढळून आला आहे. बॉबी ब्राऊन ज्युनियर (Bobby Brown Jr.) असं त्याचं नाव आहे.

ऑफिसर जेफ ली यांनी एका वृत्तपत्रासोबत बोलताना सांगितलं की, आमच्या अधिकाऱ्यांना दुपारी 1.50 वाजता एन्सीनोच्या 5200 ब्लॉक व्हाईट ओक एव्हेन्यूमध्ये एक मेडिकल इमर्जंसीबद्दल सांगितलं गेलं होतं. तिथं गेल्यानंतर अधिकाऱ्यांना एक व्यक्ती घटनास्थळी मृतावस्थेत सापडला.

ब्राऊनचा मुलगा घटनास्थळीच मृत असल्याचं सांगितलं गेलं आहे. आतापर्यंतच्या तपासात कसलंही षडयंत्र असल्याचे पुरावे समोर आलेले नाहीत.

गेल्या 8 वर्षांत बॉबीच्या घरातील हा तिसरा मृत्यू आहे. बॉबीनं आधी त्याची पत्नी व्हिटनी ह्यूस्टन (Whitney Houston) आणि नंतर मुलगी बॉबी क्रिस्टीना ब्राऊन (Bobbi Kristina Brown) यांना गमावलं होतं. आता तो आपल्या तरुण मुलाला गमावल्याचं दु:ख सोसत आहे. 2012 साली बॉबीची पत्नी व्हिटनी व्ह्यूस्टन एका हॉटेलच्या रूममधील बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळली होती. पोलिसांनी ही एक दुर्दैवी घटना असल्याचं सांगितलं होतं.

पत्नीला गमावल्यानंतर 3 वर्षांनंतर म्हणजेच 2015 साली बॉबीची 22 वर्षांची मुलगी क्रिस्टीना ब्राऊन ही अन्य एका हॉटेलच्या रूममधील बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती.

28 वर्षीय बॉबी ब्राऊन ज्युनियर (Bobby Brown Jr.) म्युझिक इंडस्ट्रीतील एक उदयोन्मुख चेहरा होता. बॉबी हे नाव म्युझिक इंडस्ट्रीत खूप फेमस आहे.

बॉबीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं माय प्रेरोगेटिव्ह, एव्हरी लिटिल स्टेप, ऑन ओव्हर ओन, गुड इनफ अशी अनेक गाणी गायली आहेत.

You might also like