Coronavirus : ‘सिंगर’ कनिका कपूरला रुग्णालयात अशा प्रकारे ठेवण्यात आलं आहे ? सिंगरनं सांगिततलं

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील प्लेबॅक सिंगर कनिका कपूर कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडली आहे. कनिकाला सध्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. सध्या कनिका रुग्णालयात डॉक्टरांच्या निगरानीत आहे. लंडनहून भारतात आल्यानंतर ती लखनऊमध्ये आपल्या पालकांच्या घरी गेली होती. घरी आल्यानंतर तिनं स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवलं नव्हतं. उलट आल्यानंतर तिनं 3 पार्ट्या अटेंड केल्याचं बोललं जात आहे. जागतिक महामारी बनलेल्या कोरोना व्हायरसबद्दल बेजबाबदारपणानं वागल्यानं तिच्यावर टीका होताना दिसत आहे.

तिच्यावर आरोप आहेत की, एअरपोर्ट आल्यांतर ती वॉशरूमचं कारण सांगून कोणतीही टेस्ट पास न करताच बाहेर पडली. यावर आता कनिकानं आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं तिनं म्हटलं आहे. इतकंच नाही तर एका वृत्त वाहिनीशी बोलताना तिनं सांगितलं आहे की, तिला रुग्णलयात कसं ठेवण्यात आलं आहे. कनिकाचं म्हणणं आहे की, तिला ताप आहे. ती घाबरलेली आहे. रुग्णालयात खायला-प्यायला काहीही नाहीये. तिला एका खोलीत एकटंच ठेवण्यात आलं आहे. तिनं असंही सांगितलं आहे की, डॉक्टर तिची तपासणी करायचं सोडून तिला धमकावत आहेत.

कनिका म्हणाली, “मला नाही माहिती माझी तपासणी कशी केली जाणार आहे. मी वैतागलेली आहे. माझी मदत करायची सोडून ते मला रागवत आहेत धमकावत आहेत. डॉक्टर वारंवार बोलत आहेत की, मी तपासणीपासून पळ काढला, मी मोठी चूक केली. सत्य जाणून न घेता ते काहीही आरोप करत आहेत. रुग्णाला असं धमकावणं योग्य नाही. कोणालाही काहीही बोलू द्यावं का. या सगळ्या अफवा आहेत. मी एअरपोर्टवर होणाऱ्या तपासणीपासून पळ काढला नाही. हे सगळं खोटं पसरवलं जात आहे.