सिंहगड घाटात दरड कोसळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

सिंहगडावरील घाटमार्गावर पहाटेच्या सुमारास दरड कोसळली आहे. त्यामुळे गडावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. रविवारीची सुट्टी आणि पाऊस असा दुहेरी संगम असल्याने हजारोच्या संख्येने गडावर जाण्याच्या तयारीत असलेल्या पर्यटकांची निराशा झाली आहे.
गेल्या वर्षी ३० जुलै २०१७ रोजी सायंकाळी ज्या ठिकाणी दरड कोसळली होती. त्याच्या जवळच आजचा प्रकार घडला आहे.

[amazon_link asins=’8184957033′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’41081012-8272-11e8-aa00-53608112008b’]

हवेली पोलिसांनी घाट रस्ता बंद केला असून दरड हटविण्यासाठी जेसीबी मागविण्यात आले असून हे कधी पूर्ण होईल, हे सध्या तरी सांगता येणार नाही. किमान आज दिवसभर तरी रस्ता बंद राहण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले.

पावसाळा आणि त्यात रविवारी असल्याने हजारो पर्यटक खडकवासला, सिंहगडवर धाव घेतात. परंतु, या घटनेमुळ गडावरील रस्ता बंद झाल्याने अनेकांची निराशा झाली. त्यांना खालूनच परत फिरावे लागले.

सिंहगड घाट रस्त्यावर गेल्या वर्षी दुपारी च्या सुमारास दरड कोसळली होती. त्यामुळे असंख्य पर्यटक गडावर अडकून पडले होते. सुमारे ३ तासांच्या प्रयत्नानंतर हा मातीचा ढिगारा काढण्यात यश आल्यानंतर एकेरी वाहतूक सुरु करुन या पर्यटकांची सुटका केली होती.