हलवाई झाला ‘मालामाल’, उघडलं ‘नशीब’ ! 250 रूपयाच्या लॉटरीच्या तिकीटानं बनवलं दीड कोटीचा मालक

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : असे म्हणतात की, ‘भगवान जब देता हे छप्पर फाड के देता हे,’ असाच काहीसा प्रकार घडला आहे कलांवालीमध्ये मिठाईचे दुकान चावणाऱ्या धर्मपालच्या बाबतीत. पंजाब राज्य राखी बंपरचा निकाल काल जाहीर झाला. शुक्रवारी सकाळी जेव्हा धर्मपालने निकाल पहिला, तेव्हा त्याला आढळले की, त्यांना दीड कोटीची लॉटरी लागली आहे. यानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. याची माहिती मंडीतील लोक आणि धर्मपालच्या नातेवाईकांना समजताच अभिनंदन करणाऱ्यांची एकच गर्दी झाली.

धर्मपालचे म्हणणे आहे की, काही दिवसांपूर्वी त्याने लॉटरीचे तिकीट खरेदी केले. जेव्हा शुक्रवारी निकाल पाहिला तेव्हा आनंदासाठी जागाच उरली नव्हती. दरम्यान, या पैकी काही रक्कम गरिबांना देणार असल्याचे धर्मपालने सांगितले. विशेष म्हणजे कलांवाली मंडईत ही तिसरी वेळ आहे, जेव्हा दीड कोटींची लॉटरी निघाली आहे. यापूर्वी एका भाजी विक्रेत्याला आणि किराणा दुकान चालवणाऱ्याला लॉटरी लागली आहे.

खरेदी केली होती 5 लॉटरी तिकिटे
प्रेम स्वीट्सचे संचालक धर्मपाल आणि देवीलाल यांनी सांगितले की, त्यांनी सुमारे एका आठवड्यापूर्वी सिरसा येथील एजंटमार्फत राखी बंपर लॉटरीची 5 तिकिटे खरेदी केली. यानंतर, सुमारे 5 दिवसांपूर्वी तोच एजंट पुन्हा त्याच्या दुकानात आला आणि सांगू लागला की, फक्त एकच शेवटचे तिकीट शिल्लक आहे, आपण देखील ते खरेदी केले पाहिजे. या शेवटच्या तिकिट क्रमांकामुळे त्याची दीड कोटींची लॉटरी लागली.

आनंदासाठी जागा नाही
गुरुवारी सायंकाळी लॉटरी एजंटने त्याला फोनवर कळविले की, त्याची दीड कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. सुरुवातीला त्याला एजंटवर विश्वास नव्हता, परंतु नंतर शुक्रवारी सकाळी एजंटने दूरध्वनी करून सांगितले की, या क्रमांकाच्या तिकिटाची लॉटरी निघाली आहे, तेव्हा धर्मपालने क्रमांक पहिला असता त्याच्या आनंदाला जागाच उरली नव्हती.