SL Vs WI Galle Test Match | वेस्ट इंडिजच्या खेळाडू Jeremy Solozano ला गंभीर दुखापत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SL Vs WI Galle Test Match | श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज (Sri Lanka vs West Indies) यांच्यातील पहिली टेस्ट आज Galle मध्ये खेळवली जात आहे. या टेस्टच्या (SL Vs WI Galle Test Match) पहिल्याच दिवशी एक अपघात घडला आहे. या टेस्टमध्ये फॉरवर्ड शॉर्टलेगला फिल्डिंग करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूला गंभीर दुखापत झाली आहे. हि दुखापत एवढी गंभीर होती कि त्याला स्ट्रेचरवरून मैदानाच्या बाहेर नेण्यात आलं. त्यानंतर तातडीनं रूग्णवाहिकेतून (Ambulance) हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. वेस्ट इंडिजच्या या 26 वर्षीय क्रिकेटपटूचं नाव जेरमी सोलोजानो (Jeremy Solozano) असे आहे. त्यानं आजच वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय टेस्टमध्ये पदार्पण केले होते.

 

 

 

पाहिल्याच टेस्टमध्ये  जेरमीला मैदानातून सरळ हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. या घटनेत फॉरवर्ड शॉर्टलेगला फिल्डिंग करत असलेल्या जेरमीच्या हेल्मेटला बॉल लागला. त्यामुळे तो मैदानातच पडला. त्यानंतर मेडिकल स्टाफनं त्याला स्ट्रेचरवरुन मैदानाच्या बाहेर नेलं. त्यानंतर त्याला रूग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. जेरमीची दुखापत किती गंभीर आहे हे त्याच्या हॉस्पिटलमधील उपाचारानंतरच समजणार आहे. जेरमीच्या या अपघातानंतर जेरमी लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने (West Indies Cricket Board) केली आहे.

 

 

नेमके काय घडले ?

श्रीलंकेच्या इनिंगमधील 24 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. त्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर दिमूथ करुणारत्नेने (Dimuth Karunaratne) मारलेला बॉल थेट जेरमीच्या हेल्मेटला जाऊन आदळला. यामुळे जेरमी मैदानात पडला. तो बॉल हेल्मेटच्या ग्रीलला लागला होता. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत वेस्ट इंडिजचे सर्व खेळाडू जेरमीजवळ जमा झाले होते. श्रीलंका सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात 2 टेस्ट सामने होणार आहेत.

 

Web Title :- SL Vs WI Galle Test Match | sl vs wi 1st test west indies debutant jeremy solozano stretchered off field after nasty head injury on day 1 marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा