Vinod Tawde | माजी मंत्री विनोद तावडे यांचे अखेर पुनर्वसन ! भाजपने दिली मोठी जबाबदारी; देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P. Nadda) यांनी आज संघटनात्मक पातळीवर काही महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून महाराष्ट्रातील अनुभवी नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांचे पुनर्वसन केले आहे. विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदाची (National General Secretary) धुरा देण्यात आली आहे. तसेच दोन राष्ट्रीय प्रवक्ते (National Spokesperson) आणि दोन नवे चिटणीसही जाहीर करण्यात आले आहे. तावडे यांच्या नियुक्तीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करुन त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीतील पाच नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज (रविवार) जाहीर केल्या. यामध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे (Vinod Tawde) यांना संधी देण्यात आली आहे. तावडे हे आता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस असणार आहेत. बिहारमधील ऋतुराज सिन्हा (Rituraj Sinha) व झारखंडमधील आशा लाकडा यांची राष्ट्रीय चिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे. तर भारती घोष (Bharti Ghosh) आणि शहजाद पूनावाला (Shahzad Poonawala) असे दोन नवे राष्ट्रीय प्रवक्ते भाजपने दिले आहेत.

 

 

माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांना 2019 मध्ये विधानसेभेला तिकीट नाकारले होते. भाजपने तिकीट नाकारलेल्या दोन मोठ्या नेत्यांचं एकापाठोपाठ पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याच्या राजकारणातून दूर असलेले विनोद तावडे आता राष्ट्रीय राजकारणात, अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर तावडे यांचे पक्षातील पुनर्वसन महत्त्वाचे मानले जात आहे.

 

दरम्यान, 2019 च्या निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलेले चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule)
यांना विधानपरिषद तिकीट देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.
तर तावडे यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदावर पदोन्नती देली आहे.
2019 च्या निवडणुकीत तिकीट नाकारल्याने तावडे नाराज होते.
मात्र आता त्यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देत त्यांची देखील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदावर पदोन्नती झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन त्यांचे अभिनंदन केले आहे.
तसेच नियुक्त झालेल्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.

 

Web Title :- Vinod Tawde | bjp-J.P. Nadda appoints vinod tawde as party s national general secretary Congratulations by Devendra Fadnavis marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा