मराठा समाजाचे आरक्षणासाठी ‘झोपमोड’ आंदोलन

अकाेला : पाेलीसनामा ऑनलाईन

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यात ठिकठीकाणी माेर्चे काढण्यात येत आहेत. यापुर्वी अनेक वेळा मराठा समाजाकडून शांततेत माेर्चे काढण्यात आले हाेते. मात्र शांततेत निघणारे माेर्चे आता हिंसक बनले आहेत. मराठा क्रांती माेर्चाचे नाव बदलून आता ‘मराठा क्रांती ठाेक माेर्चा’ झाले आहे. मात्र मराठा आरक्षणावर अजुनही ताेडगा निघत नसल्याने, राज्यात मराठा माेर्चाने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसुन येत अाहे. दरम्यान मागण्या पुर्ण करण्यासाठी अकाेल्यात ‘झोपमोड’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदाेलनामध्ये खासदार आणि आमदार यांच्या निवासस्थासमाेर आंदाेलकांनी ‘गोंधळ’ घालून मराठा आरक्षण देण्याची मागणी केली आहे.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’df8dd1ef-9719-11e8-ab00-3ffe697a3ef5′]

सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी व विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने शुक्रवारी अकाेल्यात खासदार संजय धाेत्रे व आमदार रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानासमाेर ‘झाेपमाेड’ आंदाेलन करण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदाेलकांनी यावेळी खासदार व आमदार यांच्या निवासस्थानासमाेर ‘गाेधळ’ घालत झाेपमाेड आंदाेलन केले.