Sleep Paralysis | अचानक जाग आल्यानंतर शरीर हालचाल करू शकत नाही, जाणून घ्या का येतो असा भितीदायक अनुभव?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sleep Paralysis | कधी-कधी झोपेतून जागे झाल्यानंतर शरीराची हालचाल करण्यात अडचण येते. असे वाटते की एखादी गोष्ट तुमच्या हाता-पायांना रोखत आहे. असे एखाद्या स्वप्नात नव्हे तर डोळे उघडे असताना तुम्ही अनुभवता. शरीराच्या या अवस्थेला स्लीप पॅरालिसिस (Sleep Paralysis) म्हणतात. यामध्ये व्यक्ती मेंदूच्या पातळीवर जागा असतो परंतु शरीर प्रत्याक्षात झोपलेले असते. या दरम्यान थोडा सुद्धा आवाज येणे खुप भयावह असते. काही लोकांना असेही जाणवते की त्यांचा श्वास कोंडला आहे. तर, काही लोकांना स्लीप पॅरालिसीसच्या दरम्यान असे जाणवते की त्यांचे शरीर हवेत उडत आहे.

स्लीप पॅरालिसिसच्या (Sleep Paralysis) मागे अनेक मानसिक कारणे आहेत. ’द जर्नल’नुसार, या विषयावर केलेले 35 स्टडीज 2011 मध्ये एका पेपरमध्ये छापण्यात आले होते. या स्टडीजमध्ये 36,000 वॉलंटियर्सने भाग घेतला होता. स्टडीजच्या लेखकांनुसार, स्लीप पॅरालिसिस सर्वात जास्त विद्यार्थी किंवा अशा लोकांमध्ये आढळतो, ज्यांचा स्लीपिंग पॅटर्न खराब आहे. याच्याशिवाय तणाव, डिप्रेशन सारख्या मेंटल डिसऑर्डर असलेल्या लोकांमध्ये सुद्धा स्लीप पॅरालिसिसची लक्षणे दिसून येतात.

शरीर का हालचाल करू शकत नाही –
झोपण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण तीन किंवा चार नॉन-आरईएम (rapid eye movement) आणि एक रॅपिड आय मूव्हमेंटच्या टप्प्यातून जातो. एक्सपर्ट म्हणतात की यापैकी कोणत्याही टप्प्यात स्वप्न येऊ शकते. परंतु रॅपिड आय मूव्हमेंट तो टप्पा आहे जिथे स्वप्न एकदम वास्तव वाटू लागतात.

(Sleep Paralysis) स्लीप पॅरालिसीस प्रोजेक्टवर काम करणारे संशोधक डॅनियल डेनिस यांनी सांगितले की, रॅपिड आय मूव्हमेंटच्या दरम्यान मेंदू सक्रिय अवस्थेत राहतो. आरईएममध्ये लोक स्वताला स्वप्नातून बाहेर आणण्याच्या दरम्यान स्वाभाविक प्रकारे लकवाग्रस्त होतात, यास आरईएम एटोनिया सुद्धा म्हटले जाते. ही अवस्था काही सेकंदापासून एक मिनिटापर्यंत राहते. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये ती 10-15 मिनिटापर्यंत सुद्धा राहू शकते.

 

स्लीप पॅरालिसिसची लक्षणे

– स्लीप पॅरालिसिसचा भ्रामकपणा तीन मुख्य श्रेणींमधून जातो – भितीदायक स्वप्न, अचानक पडणारी स्वप्न, आणि असामान्य शारीरिक अनुभव.

बहुतांश लोकांना छातीवर मोठा दबाव जाणवतो.

ज्यामुळे असे वाटते की श्वास घेण्यास त्रास होत आहे.

या दरम्यान ऑक्सीजनची पूर्ण मात्रा शरीरात असते परंतु केवळ भितीमुळे वाटते की श्वास घेता येत नाही

या दरम्यान मेंदूत एक प्रकारचा विरोधाभास होतो.

मेंदू आणि शरीर यांच्यात संतुलन होऊ शकत नाही.

हे लक्षात ठेवा

स्लीप पॅरालिसिस कुणालाही होऊ शकतो.

सामान्यपणे हा झोपेची कमतरता किंवा अडचण, जेट लॅग किंवा शिफ्टमध्ये काम करणार्‍यांना जाणवतो.

यास हायपरटेन्शन, झटका आणि नार्कोलेप्सी सोबत जोडून पाहिले गेले आहे, जिथे लोकांचे स्लीप सायकल बिघडते आणि कधीही कुठेही झोपतात.

यासाठी पाठीवर झोपू नका. पाठीवर झोपणार्‍यांना हा अनुभव जास्त येतो.

हालचाल करता येत नसेल तर आपली सर्व एनर्जी पाय किंवा हाताच्या बोटांवर लावा.

या आवस्थेत बोटे आणि मांसपेशींवर लक्ष केंद्रीत करा.

मांसपेशीत थोडीजरी हालचाल झाली तरी स्लीप पॅरालिसीस नष्ट होतो.

Web Title :- sleep paralysis strange phenomenon symptoms prevention

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cancer | दारू पिणार्‍यांनी व्हावे सावध, कॅन्सरबाबत समोर आला भितीदायक रिपोर्ट; जाणून घ्या

Male Contraception | पुरुषांसाठी ‘कंडोम’ला नवीन पर्याय, चुंबकाने स्पर्म होतील ‘कंट्रोल’; जाणून घ्या

Pune News | पुण्यात क्रीडांगणावर श्रीरामांचे शिल्प उभारण्याच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा तीव्र विरोध, शहराध्यक्ष म्हणाले – ‘क्रीडांगणात राजकीय, धार्मिक खेळ कशाला?’