Sleeping Disorder | तुम्हाला सुद्धा अंथरूणावर पडताच येते का झोप? स्लीप डिसॉर्डरच्या ‘या’ लक्षणाकडे करू नका दुर्लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sleeping Disorder | काही लोकांना अंथरूणांवर पडल्यानंतर तासभर झोपच येत नाही, तर काही लोकांना ताबडतोब झोप येते. लवकर झोपणे आरोग्यासाठी चांगले असते परंतु आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, खुप लवकर झोप येणे सुद्धा काही बाबतीत हानिकारक असते आणि हा काही गोष्टींचा संकेत (Sleeping Disorder) असू शकतो.

झोप येण्यासाठी इतका वेळ लागावा –
लवकर झोपत असाल तर ही चांगली गोष्ट आहे. हेल्थ एक्सपर्टनुसार, बहुतांश लोकांना झोपण्यासाठी जवळपास 5 ते 20 मिनिटांची आवश्यकता असते. मात्र, ही वेळ तुमच्या शरीराच्या हिशेबाने वेगवेगळी सुद्धा असू शकते. (Sleeping Disorder)

काय म्हणतात एक्सपर्ट –
अमेरिकेच्या बिहेवियरल स्लीप मेडिसिन सायकॉलॉजिस्ट मिशेल ड्रेरुप यांच्यानुसार, जर तुम्हाला 3 मिनिटात झोप येत असेल आणि झोपून उठल्यानंतर ताजेतवाने वाटत असेल तर तुम्हाला अस्वस्थ होण्याची गरज नाही. मात्र काही बाबतीत हा या गोष्टीचा सुद्धा संकेत असू शकतो की, झोप पूर्ण होत नाही यामुळे अंथरूणावर पडताच झोप येते. असे तेव्हा होते जेव्हा तुम्ही चुकीच्या वेळी झोपता किंवा लवकर उठता परंतु वेळेवर गाढ झोप मिळत नाही.

होऊ शकतात या समस्या –
खुप लवकर झोप येण्याचा संबंध स्लीप डिसऑर्डरसोबत असू शकतो.

जर रात्री 6 तासापेक्षा सुद्धा कमी झोप घेत असाल तर निश्चितपणे तुम्ही पूर्ण झोप घेत नाही आणि यामुळे तुम्हाला कधीही, कुठेही ताबडतोब झोप येते.

खाण्या-पिण्याप्रमाणे तुमच्या शरीराला झोपेची सुद्धा तेवढीच आवश्यकता असते.

तज्ज्ञांनुसार ज्या लोकांची झोप पूर्ण होत नाही त्या लोकांमध्ये डायबिटीज, हृदयरोग, लठ्ठपणा, हाय ब्लडप्रेशर आणि डिप्रेशनचा सुद्धा धोका वाढतो.

यासाठी कुठल्या स्थितीत 7-8 तास झोप आवश्य घ्या.

Web Title :- Sleeping Disorder | health fall asleep instantly sleeping disorder drift off

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 73 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

BJP MLA Sunil Kamble | आमदार सुनिल कांबळेंवर गुन्हा दाखल करा; पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पोलिसांना निवेदन

BJP MLA Sunil Kamble | आमदार कांबळे यांचा सर्वपक्षीय महिला पदाधिकाऱ्यांकडून निषेध, कारवाईची मागणी