छा गये ! ‘या’ कारणामुळे भारतीय महिला पतीच्या 2 पावलं मागे चालतात, स्मृती इराणींनी सांगितलं (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिला, बाल विकास आणि टेक्सटाइल मंत्री स्मृती इराणी आपल्या विधानांमुळे कायमच चर्चेत असतात, मग ते ट्विटर असो, संसद असो किंवा मग भाषण. त्यांची विधान कायमच चर्चेत राहतात. सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट देखील चर्चे राहतात. यामुळे त्या कायम बातम्यांमध्ये झळकतात. सोशल मीडियावर आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात स्मृती इराणी यांच्या उत्तरामुळे लोक त्यांचे कौतूक करत आहेत. हा व्हिडिओ टिकटॉकवर तयार करण्यात आला आहे.

https://twitter.com/murthykp/status/1212654411014639616

हा टिकटॉकच्या जुना व्हिडिओ (@paahi.official) अकाउंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. यावर यूजर्स आपल्या रिअ‍ॅक्शन देखील देत आहेत. या व्हिडिओनुसार स्मृती इराणी बोलताना दिसत आहे की, ते म्हणतात की तु थोडीशी रुढीवादी आहे, पतीच्या दोन पावले मागे चालत आहे, तुमच्या सारख्या महिलांची समस्या हीच आहे. देवाने काही न काही तरी निश्चित केले आहे, संस्कारच काही असे दिले आहेत हिंदुस्तानच्या महिलांनी विचार केला की पती कधी डगमगला तर त्याला आधार देण्याची हिम्मत फक्त माझ्यात आहे. त्यामुळे मी दोन पावलं मागे चालते.

हा व्हिडिओ शेअर करत यूजरन लिहिले की भारतीय महिलांच्या मागे का चालते, याचे सर्वात चांगले उत्तर हे आहे. हा व्हिडिओ लोक वेगाने शेअर करत आहे आणि स्मृती इरानींची स्तुती करत आहे.

यापूर्वी देखील स्मृती इरानींनी स्वत:वर कमेंट करत अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यात त्यांच्या वजनासंबंधित शेअर करण्यात आलेला फोटो वेगाने व्हायरल झाला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/