Smriti Irani On Rahul Gandhi | स्मृती इराणींचे राहुल गांधींसह काँग्रेसवर टीकास्त्र, अहंकारी पक्षाला युवकांनी धडा शिकवण्याची वेळ आली

नागपूर : Smriti Irani On Rahul Gandhi | आपण पाचशे वर्षे राममंदिराची वाट पाहिली. आज मोदींच्या सक्षम नेतृत्वामुळेच संविधानिक मार्गाने मंदिर उभे आहे. परंतु, श्रीरामाचे अस्तित्वच नाही असे शपथपत्र न्यायालयात देणाऱ्या काँग्रेसचा अहंकार गेलेला नाही. त्यांनी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले. सर्जिकल स्ट्राईकचे सैन्याच्या शौर्याचे पुरावे काँग्रेसने मागितले. अशा अहंकारी पक्षाला युवकांनी धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे टीकास्त्र केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर सोडले. (Smriti Irani On Rahul Gandhi)

नागपूर विद्यापीठ मैदानात झालेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनात त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

स्मृती इराणी म्हणाल्या, राहुल गांधींना आवाहन आहे. त्यांनी देशातील कुठलेही एक मैदान निवडावे. आम्ही त्यांच्याशी चर्चेला कधीही तयार आहोत. भाजयुमोचा एक साधा कार्यकर्ताही राहुल गांधींना चर्चेमध्ये हरवू शकतो.

राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप करताना स्मृती इराणी म्हणाल्या, मुंबईवर २६ नोव्हेंबरला हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी जल्लोष करत होते.

दरम्यान, या कार्यक्रमात तेजस्वी सूर्या यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या घराणेशाहीवर टीका केली. तर चंद्रशेखर बावनकुळे लोकसभा निवडणुकीत मोदींना विजयी करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, संचालन भाजयुमोच्या पदाधिकारी शिवानी दाणी यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police ACP-Inspector Transfers | पुणे पोलिस आयुक्तायातील 26 अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या, नियुक्त्या ! 3 ACP सह 11 पोलिस निरीक्षकांचा समावेश

Lok Sabha Elections 2024 | अमित शहांची सायंकाळी संभाजीनगरमध्ये सभा, महाराष्ट्र दौऱ्यात सभा-बैठकांचा धडाका, जागावाटपाचा प्रश्न सोडवणार

Pune CP Amitesh Kumar | पोलीस आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर! पुण्यात 144 CRPC ची ऑर्डर सुधारित ऑर्डर 31 मार्च पर्यंत लागू राहणार; जाणून घ्या नवीन नियम व अटी

Ajit Pawar On PMC Property Tax | समाविष्ट गावातील मिळकत कर थकबाकीसाठी जप्तीसारख्या कारवाया करू
नयेत; पालकमंत्री अजित पवार यांचे महापालिकेला आदेश

Punit Balan Group (PBG) | पुनित बालन ग्रुप तर्फे पुणे पोलिस कल्याण निधीला 5 लाख रूपयांची देणगी सुपूर्त (Videos)

Editors Guild Of Pune-Pimpri | पुणे-पिंपरी डिजीटल मिडियाच्या Editors Guild ची स्थापना, कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न