home page top 1

धक्‍कादायक ! साप चावल्यानंतर दारूड्याने सापालाच ‘चघळलं’, तुकडे घेवून पोहचला हॉस्पीटलमध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील असरौली गावात एक धक्कादायक आणि सर्वांना चकित करणारी घटना घडली आहे. या गावातील एका दारू पिलेल्या व्यक्तीला साप चावल्यानंतर त्याने दारूच्या नशेत या सापाचा इतका कडकडून चावा घेतला कि, त्याचे तीन तुकडे केले. त्यानंतर त्याने शांत न बसता तो साप घेऊन तो दवाखान्यात गेला. हा व्यक्ती दारूच्या नशेत असताना त्याला या सापाने चावा घेतल्यानंतर त्याने या सापाला जोरात चावले.

या व्यक्तीने त्या सापाचा इतका जोरात चावा घेतला कि, त्या सापाचे तीन तुकडे झाले. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्या ठिकाणी येऊन त्याची सुटका केली. त्या व्यक्तीने चावा घेतल्यामुळे त्या सापाचा जागीच मृत्यू झाल्यानंतर त्या सापाला एका पिशवीत घेऊन तो व्यक्ती दवाखाण्यात दाखल झाला. त्याचबरोबर त्या व्यक्तीला देखील गंभीर अवस्थेत दवाखान्यात भरती करण्यात आले.

दरम्यान, त्या व्यक्तीच्या शरीरात सापाचे विष पसरल्याने त्याला आग्रा येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मृत सापावर गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार केले.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like