Coronavirus : तर लग्नात मुलीचा बाप होणार नाही कर्जबाजारी, बबिता फोगाटनं दिली ‘आयडिया’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारने पुन्हा एकदा दोन आठवड्यांनी लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे अनेकांच्या घरात ठरलेली लग्नाचे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आली आहेत. लॉकडाऊन वाढल्याने अनेक लग्नइच्छूकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात देखील लग्न करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र, काही अटी घालण्यात आल्या आहेत. लग्न समारंभात वधू आणि वर यांच्याकडील केवळ 50 लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे.
देशात 17 मे पर्य़ंत आता लॉकडाऊन कायम राहणार आहे. या लॉकडाऊन कालावधीत अनेकांची लग्न कार्य रखडली आहेत. पण, काहींनी 5-10 माणसांमध्ये आपापला विवाह सोहळा पार पाडला. कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मोजक्याच नातेवाईकांमध्ये लग्न करावं लागत आहे. असे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राष्ट्रकुल पदक विजेती आणी भाजप नेता बबिता फोगाट हिनं कोरोना व्हायरसमुळे एक नवी परंपरा सुरु झाल्याचे सांगितले आहे.

बबिता फोगाटनं ट्विट केले आहे. यामध्य तिनं सध्या 5-10 ते लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य केलं जात आहे. हीच परंपरा कोरोना व्हायरस संपुष्टात आल्यानंतर कायम राहिल्यास मुलीच्या बापावर कर्जबाजारी होण्याची वेळ येणार नाही. माझी देशवासियांना हात जोडून विनंती आहे की, त्यांनी ही परंपरा कायम राखावी. यामुळे देश सामाजिक आणि आर्थिक रुपाने मजबूत बनेल.