उद्योजक महिंद्रांकडून मुख्यमंत्री ठाकरेंचं कौतुक; म्हणाले – ‘…म्हणून बैठक उपयुक्त झाली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार उपाययोजनांसाठी बैठका घेत आहेत. मंगळवारी कोरोनासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्योजकांसोबत चर्चा केलीय. यावेळी चर्चेदरम्यान भारतातील प्रसिद्ध उद्योगपती तसेच महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी बैठकीचे खास कौतुक केलं आहे. मुख्यतः महिंद्रा यांनी लॉकडाऊनवरून एक सल्ला मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीदरम्यान राज्यातील करोनाची परिस्थिती, करोनाच्या तिसऱ्या लाटेचा जनतेला आणि उद्योगधंद्यांना फटका बसू नये यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा सांगितला. तसेच, त्यावेळी वेगवान लसीकरण यासंदर्भात उद्योगपतींशी चर्चा देखील केली. यावेळी अनुभव सांगताना आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँलडवरुन या बैठकबाबत माहिती देण्यात आली होती. CMO ने केलेल्या ट्विटला उद्योगपती आनंद महिंद्रा रिट्वटि करत प्रतिक्रिया व्यक्त केले आहे.

बैठकीवरून उद्योगपती आनंद महिंद्रा म्हणतात, ज्या पद्धतीने बैठक झाली त्यावरुन आमची ही बैठक उपयुक्त झाली असं वाटतं. कारण उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत वेळ वाया न घालवता मुख्य आणि नेमक्या मुद्द्यांवर सल्लामसलत करण्यात आल्याचं सांगत महिंद्रा यांनी ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. या दरम्यान, महिंद्रा यांनी लॉकडाऊनवरून उद्धव ठाकरे यांना एक सल्ला दिला होता. त्यावरून ठाकरे यांनी त्यावेळी लॉकडाऊनबाबत वक्तव्य करणाऱ्यांचा समाचारही घेतला होता. यामध्ये उद्योगपतीच्या वक्तव्यालाही उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर दिलं होतं.

तर, उद्योगपतीने लॉकडाऊन करण्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करा असा सल्ला दिला होता. आरोग्य सुविधा वाढवल्याच आहेत आणि त्या वाढवणे सुरुच आहे, मात्र फक्त, आरोग्य सुविधा वाढवून चालणार नाही, तर त्यासाठी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांची आवश्यकता आहे. आरोग्य सुविधा हाताळण्यासाठी तज्ज्ञांची गरज भासत असते. त्यांचा पुरवठा हे उद्योगपती करणार का? असा टोला देत मुख्यमंत्र्यांनी देत. असे भाष्य न करण्याची विनंती देखील केली होती.