कॅबिनेट मंत्र्याचा ‘चार्ज’ घेतल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच भगवानगडावर, पंकजा ताईंना ‘टोला’, म्हणाले…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच भगवानगडावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला. ते म्हणाले की नारायण गड, भगवान गड, गहिनीनाथ गड आणि जिल्ह्यातील इतर कोणत्याही गडावर इथून पुढे राजकारण होणार नाही, होऊ दिले जाणार नाही. धनंजय मुंडे म्हणाले की शक्ती पीठाचे दर्शन घेऊन विकासाला सुरुवात करणार, मी उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही अशा शब्द देतो.

यावेळी आमदार प्रकाश सोलंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब अजबे, माजी आमदार अमरसिंह पंडित, महंत शिवाजी महाराज यांची उपस्थिती होते. यावेळी मंत्री आणि पालकमंत्री म्हणून पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या धनजंय मुंडेंनी नगद नारायण गडावर जाऊन दर्शन घेतले. गडाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

मंत्री आणि पालकमंत्री झाल्यानंतर धनजंय मुंडे नगद नारायणाच्या समाधीपुढे नतमस्तक झाले. नारायण गडाचे दर्शन घेऊन ते पुढे भगवान गडावर दर्शनासाठी गेले. धनंजय मुंडे म्हणाले की जिल्ह्यातील विकासासाठी नगद नारायणाने आशिर्वाद द्यावेत. देवस्थानचा विकास करण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांना घेऊन येणार आहे. देवस्थानाचा विकास आराखड्याबाहेर जाऊन केला जाईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/