‘या’ अभिनेत्रीने शेअर केले नग्न फोटो आणि झाले असे काही..

0
212
actress

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टेलिव्हिजन स्टार आणि मॉडेल सोफीया हयात हिने स्वतःचे न्यूड फोटो इन्स्ट्राग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे नग्न रुप पाहून तिचेच अनेक चाहते भडकले आहेत. सर्वजण तिच्या या फोटोमुळे संताप व्यक्त करताना दिसत आहे. तिचे अनेक फोटो आजवर सोशलवर चर्चेत राहिले आहेत. हे असेच फोटो भारताला बलात्कार सारख्या प्रकाराला प्रोत्साहित करतात अशी टीका तिच्यावर करण्यात आली आहे. अनेकांनी तिच्याबद्दल राग व्यक्त केला आहे.

काही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करताना कमेंट करताना म्हटले आहे की, ‘तुमच्यासारख्या महिलांविरुद्ध जर कारवाई केली तर बलात्कारासारखी प्रकरणं थांबतील.’ नेटकऱ्यांकडून सोफीला कौतुकाची अपेक्षा होती. परंतु नेटकऱ्यांच्या अशा कमेंट्स पाहून मात्र सोफीयाला धक्काच बसला आहे. तिने अशा प्रकारच्या कमेंट्सचा स्क्रीनशॉटच काढला आहे आणि या कमेंट्सबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नेटकऱ्यांच्या संतापाच्या कमेंट्सवर आपली प्रतिक्रिया देताना सोफीया म्हणते की, “माझ्या पोस्टवर आलेल्या प्रत्येक कमेंट मी वाचत नाही. काय सत्य आहे? जगात अजुनही असे लोक राहतात? मी विचारही करू शकत नाही की, भारतात अशा विचारांचे लोक आहेत.’ तुमच्या सगळ्यांचा या बद्दल काय विचार आहे, असे तिने विचारले आहे.