सोलापूरः मराठा समाजाच्या चक्का जाम आंदोलनातील कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर : पोलीसनामा आॅनलाईन-

मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापुरात चक्का जाम आंदोलनाला सुरूवात केली असून, शिवाजी चाैकात आंदोलकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली आहे. शिवाजी चाैक आणि संभाजी चाैकात आंदोलकांनी ठिय्या दिल्यामुळे तुळजापूर, अक्कलकोट, पुणे आणि पंढरपूरकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’31542b8b-8cbc-11e8-a603-dd59f5934668′]

शिवाजी चौकाजवळ एक एसटी मुख्य मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाने एसटी स्थानकाकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना मोर्चातील कार्यकर्त्यानी एसटीवर दगडफेक केली. यामध्ये एसटीचे नुकसान झाले आहे.

पंढरपूरची वारी सुरळीत व्हायची असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात पाय ठेवू नये, तसेच पोलीस सुरक्षा यंत्रणेत पांडुरंगाची पूजा करण्याचा प्रयत्न करु नये, एवढेच नाही तर समाजाची फसवणूक करुन पंढपुरात आलात तर उद्रेक होईल, इशारा सोलापूर सकल मराठा समाजाने दिला आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. आपल्या मागणीसाठी व्यापक प्रमाणत त्यांनी सकाळपासूनच आंदोलनाला सुरूवात केली आहे.

लातूरमध्ये देखील  चक्काजाम आंदोलनाला सुरूवातः

लातूर-सोलापूर आणि लातूर-उमरागा रस्त्यावरील अाैसा चाैकातील मराठा समाजाच्या चक्का जाम आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्यासाठी आंदोलक सकाळपासूनच रस्त्यावर बसले आहेत. हा मार्ग वर्दळीचा असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा  बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’37707fb3-8cbc-11e8-a1b8-9735af43e28b’]

तर इकडे जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शोले स्टाईल आंदोलन केले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी चक्क पाण्याच्या टाकीवर ठिय्या मांडला. मराठा समाजाच्या वतीने परतूर, मंठा जाफराबाद येथे ठिय्या आंदोलन करण्यात आलं. परळी येथील आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलक कर्त्यांनी हे आंदोलन केले.