Coronavirus : चिंताजनक ! सोलापूरमध्ये ‘कोरोना’चे 10 रूग्ण आढळले (Video)

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात आणखीन 10 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काही वेळापूर्वी ही माहिती दिली आहे.

जे दोन रुग्ण सोलापुरात पाच्छा पेठ परिसरात काही दिवसांपूर्वी सापडले .यातील एका मृत पॉझिटिव्ह व्यक्तीचे नातेवाईक पैकी एक आहे. तर इतर पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे सर्वजण पाच्छा पेठ परिसरातीलच आहेत यामुळे सोलापुरात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज दुपारी बारा वाजेपर्यंत बारा इतकी झाली असून, यातील एक व्यक्ती यापूर्वीच मृत्यू पावला आहे.तर बाकी सर्व 11 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लोकांनी सरकारी यंत्रणेच्या आवाहनास प्रतिसाद द्यावा .सोशल डिस्टन्स पाळावा असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केलं आहे.