Solapur Crime | सोलापूर-विजापूर महार्गावरील ब्रिजला कार धडकली; 4 ठार तर 1 जखमी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Crime | सोलापूर-विजापूर महामार्गावरील (Solapur-Vijapur Highway) कवठे गावाजवळील ब्रिजला कार धडकून झालेल्या भीषण अपघातात (Accident) चार जणांचा जागीच मृत्यू (Died) झाला तर एक जण जखमी झाला (Solapur Crime) आहे. हा अपघात आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडला.

 

अरुण कुमार लक्ष्मण (Arun Kumar Laxman) (वय 21), महीबूब मोहम्मद अली मुल्ला (Mahibub Mohammad Ali Mulla) (वय 18), फिरोज सैफसाब शेख (Feroz SaifSaab Sheikh) (वय 20), मुन्ना केंभावे (Munna Kembhave) (वय 21, सर्व राहणार यरकल केंडी, ता. सिंदगी, जि. विजापूर, कर्नाटक) अशी अपघातात मृत्‍यू झालेल्‍या तरुणांची नावे आहेत. (Solapur Crime)

 

याबाबत माहिती अशी, अरुण कुमार (Arun Kumar) आणि जखमीसह इतर कार मधून सोलापूरला येत होते. त्यावेळी पहाटे 4 वाजता विजापूर महामार्गावरील नवीन कवठे गावाजवळील ब्रिजला कारची धडक बसली. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे (Salgar Vasti Police Station) सहाय्यक फौजदार आर. ए. जाधव (ASI R. A. Jadhav) यांनी अपघातस्थळी धाव घेतली. सिव्हिल पोलीस चौकीत (Civil Police Chouki) अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

 

Web Title :- Solapur Crime | four killed and one injured in road mishap on solapur vijapur highway

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar-Raosaheb Danve | रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची दिल्लीत गळाभेट; राजकीय चर्चेला उधाण

 

Cryptocurrency Prices Today | मागील 24 तासात तीन क्रिप्टोकरन्सीजमध्ये झाली 500% वाढ, बिटकॉईन स्टेबल