सुभाष मणुरे यांनी रांगोळी तुन साकारले शेतकर्‍याचे ‘कोरोना’च्या लढाईंचे वास्तव चित्र

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या शेतकरी मोठ्या धर्मसंकटात सापडला आहे. शेतक ऱ्याचा मालाला उठाव नाही जर उठाव केला तर व्यापारी लोक कवडीमोल किमतीने माल उचलत आहेत अशी दुर्देवी वेळ शेतक-यावर ओढवली आहे कोरोनाच्या संकटात हे दुसरे संकट उभे राहिले आहे,नेमके याचेच बोलके चित्रण अक्कलकोट चे सुप्रसिद्ध चित्रकार सुभाष मणुरे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून रांगोळी च्या माध्यमातून रेखाटले आहे

सुभाष मणुरे यांनी चिञातून साकारलेली ही रांगोळी शेतकऱ्यांची सद्याची करुण कहाणी दर्शवित आहे. अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील सुभाष मलप्पा मणुरे यांनी कोरोनामध्ये सापडलेल्या शेतकरी-यावर आधारीत अत्यंत सुंदर व वास्तविक रेखाटन केले आहे. मी एक शेतकरी पुञ आहे .मला कलेची आवड आहे म्हणून मी चित्र रेखाटले आहे.

कोरोनामध्ये शेतकरी खुप संकटात सापडला आहे. कारण शेतात पिकलेला माल विकला जात नाही, कुठे कुठे तर माल सडून जात आहे, कुठे कुठे तर पुर्ण बागेवर कुऱ्हाड फिरवण्याची वेळ आली आहे.
पिकाला लहान बाळासारखे सांभाळ करायचे पण त्याच बाळाचा गळा कापायचे अशी दुर्देवी वेळ शेतकऱ्यांवर येणे हि अंत्यत दुःखद व गंभीर प्रसंग आहे. कारण बँकेचे, सोसायटीचे, सावकारी कर्ज काढायचे पिकाचे दाम न मिळाल्याने कर्ज फेडता येत नाही,आणि पुढील वर्षाकरीता बी- बीयाणे,खते आणण्यासाठी पैसे नाहीत अशा द्विधा संकटात शेतकरी सापडला आहे.

इकडे आड तिकडे विहीर ,अशी अवस्था शेतक-याची असून ही हा शेतकरी रणभुमीतील योद्या सारखे लढतोय कारण त्याला माहित आहे की, मी काम केलो नाही तर जग उपाशी राहील. जगाचा पोशिंदाच शेतकरी आहे, हे शेतक-याने दाखवून दिले आहे.

सामाजिक संघटना, दानशुर गरजुःना मदत करताना शेतकऱ्यांचे धान्य व भाजीपाला विकत घेऊन वाटले तर त्यांना दिलासा मिळेल. या धर्मसंकटात सापडलेला शेतकरीच जगाला अन्नपुरवठा करुन कोरानाचा तारणहार ठरला आहे. सुभाष मणुरे यांनी शेतकऱ्यांची वास्तविक करुण कहाणी आपल्या चिञातून आणि रांगोळी च्या माध्यमातून साकारली आहे.