‘हुतात्मा’ जवनाच्या पत्नीकडून PM CARES फंडाला 2 लाखांची मदत, आदर्श घेऊन Tax भरण्याचा CDS रावत यांचा सल्ला

नवी दिल्ली – हुतात्मा सैनिकाच्या विधवा पत्नीने पंतप्रधान रिलिफ फंडाला 2 लाख रुपयांचा निधी दिली आहे.दार्शनी देवी या 82 वर्षांच्या असून,त्यांचे पती भारतीय लष्करात हवालदार पदावर कार्यरत होते. 1965 मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धामध्ये ते हुतात्मा झाले. दार्शनी देवी यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बचत केलेले 2 लाख रुपये पंतप्रधान केअर फंडाला दिले आहेत. उत्तराखंडमधील अगस्त्यमुनी गावात त्या राहतात स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी ही मदत जमा केली. त्यांच्या या दातृत्वाचे कौतुक संरक्षण दलांचे प्रमुख (CDS) जनरल बिपीन रावत यांनी केले आहे. ‘श्रीमती दार्शनी देवींनी पंतप्रधान केअर फंडाला मदत करून एक आदर्श घालून दिला आहे. लष्कराच्या आतापर्यंतच्या परंपरेचा आम्हाला अभिमान आहेच तसाच अशा गोष्टींमुळे भविष्यातही आम्हाला लष्कराचा अभिमान वाटत राहील. दार्शनी देवींनी घालून दिलेल्या आदर्श उदाहरणातून शिकून नागरिकांनी मदत करावी आणि अगदी ते जरी जमलं नाही तरी किमान आपलं कर तरी वेळेत भरावा, ‘ असे मत रावत यांनी व्यक्त केले.