भोकर : मुख्य रस्त्यावरील जिवघेणी वाहतूक दोन दिवसात सुरळीत न केल्यास शिवसेनेचे आंदोलन

 भोकर : माधव मेकेवाड

भोकर शहरातील मुख्य रस्त्यावर वाहणे बेजबाबदारपणे लावुन रस्ता कोंडीत करून ठेवत असल्याने सर्व सामान्य लोकांना व शालेय विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास होत असल्याने हा रस्ता दोन दिवसात सुरळीत करून रस्त्यावरील वाहणे लावा अन्यथा हजारो विद्यार्थ्यांसह शिवसेनेकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c6128937-c217-11e8-93f0-7d2be99e950c’]

 या बाबत असे कि भोकर शहरातील किनवट रोड, आंबेडकर चौक ते शिवाजी चौक आणि नांदेड रोड हे मुख्य रस्ते आहेत. याच रस्त्यावर शाळा, कॉलेज आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून हजारो विद्यार्थी शाळेत शिक्षणासाठी ये-जा करतात.अशात किनवट रोड ते बोरगाव रस्त्यांपर्यंत आणि आंबेडकर चौक ते शिवाजी चौकापर्यंतच्या रस्त्यावर आटो ,जीप, टेम्पो, ट्रक ईत्यादी वाहणे आडवे तिडवी लावुन रस्त्यांची कोंडी करत असल्याने याचा नागरिकांना त्रास होत आहे. विद्यार्थ्यांना ह्या रस्त्यावरून जाताना आपला जिव मुठीत धरून जावे लागत आहे. त्यामुळे या वाहणाच्या कोंडीमुळे कधी काय होईल याचा नेम नाही, यातच एखादी अघटित घटना घडली तर याला जबाबदार कोण? रस्त्यावर बेदखल उभी असलेली वाहणे हटविण्या ऐवजी पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करतात.

निनावी पत्राने फोडली लैगिंक अत्याचाराला वाचा

त्यामुळेच अवैध वाहतुक बोकालली आहे, सदरील बेजबाबदार वाहतुक हटवून रस्ता येत्या दोन दिवसात मोकळा करावा अन्यथा शिवसेना विद्यार्थ्यासहित उग्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाला दिला. या निवेदनात जेष्ठ शिवसैनिक सुभाष  नाईक, शहर प्रमुख  माधव पा. वडगावकर, माजी तालुका प्रमुख प्रदीप दौलतदार, बालाजी येलपे,हनमंत अनंतवाड, साईनाथ कोलगावकर, युवासेनेचे गणेश आरलवाड, श्याम पा. वानखेडे, पुंडलीक भोसले व इतर काही शिवसैनिकाच्या सह्या आहेत.

[amazon_link asins=’B00KGZZ824,B074ZF7PVZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0f6fbfdf-c21a-11e8-8924-f1b7caa9159c’]