‘या’ नेत्याच्या मुलाचे लवकरच होणार चित्रपट सृष्टीत एंट्री

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा मुलगा जीतची पावलं सिनेसृष्टीकडे वळली आहेत.’सोन्या’ या चित्रपटाद्वारे रामदास आठवले यांचा मुलगा जीत मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे.
 मराठी चित्रपट ‘सोन्या’ चा धमाकेदार मुहूर्त केंद्रीय मंत्री श्रीरामदास आठवले यांच्या शुभहस्ते पार पडला. सिद्धार्थ एंटरप्राइजेज आणि अंजली एंटरप्राइजेजद्वारा प्रस्तुत ‘सोन्या’चा मुहूर्त बोरीवली इथल्या बे व्यू बेनक्वेट हॉलमध्ये चित्रपटातील कलाकार-तंत्रज्ञांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या सिनेमाचं दिग्दर्शन मुरली लालवाणी करणार आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0bf51404-c57b-11e8-aa94-0bec91580c17′]
चित्रपटात अंडर १४ क्रिकेट टीमची कथा असून यामध्ये श्रीरामदास आठवले यांचा मुलगा जीत मुख्य भूमिका साकारत आहे. रामदास आठवले यांच्या हस्ते मुहूर्त क्लॅप झाला.
आठवले यांनी क्लॅप दिल्यानंतर अधिकृतपणे या सिनेमाचं चित्रीकरण सुरू करण्यात आलं. यावेळी बोलताना आठवले म्हणाले कि, मी नेता असलो तरी माझा मुलगा अभिनेता बनला आहे. ही फारच सुखद आणि आनंदाची बाब आहे. जीतला फिल्मी दुनियेतील एंट्रीबद्दल आणि ‘सोन्या’ सिनेमाच्या टिमला पुढील वाटचालीसाठी आठवले यांनी शुभेच्छाही दिल्या.

 

जाहिरात

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B07GB9Z17Z’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b772652-c57c-11e8-8b24-77e8e03db5fe’]