Sonakshi Sinha Engagement Ring | अखेर सोनाक्षी सिन्हाचं ठरलं ? फोटोतील हिऱ्याची अंगठी बघून नेटकऱ्यांनी लावला साखरपुड्याचा अंदाज.. जाणून घ्या कोण आहे सोनाक्षीचा मिस्ट्रीमॅन?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sonakshi Sinha Engagement Ring | बॉलीवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हानं (Sonakshi Sinha) आपल्या अभिनयाच्या बळावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच आपले हॉट (Sonakshi Sinha Hot Photo) आणि लेटेस्ट फोटो (Sonakshi Sinha Latest Photo) शेअर करून नेटकऱ्यांना घायाळ करत असते. तिच्या लेटेस्ट फोटोची अनेक चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.

 

सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून सोनाक्षीनं तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. तिनं इंन्टाग्रामवर काही फोटो (Sonakshi Sinha Engagement Photos) शेअर केले आहेत. तिनं आपल्या आयुष्यातील मोठी आनंददायी बातमी सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर केली आहे. सोनाक्षीनं आपल्या साखरपुड्या बद्दलच्या गोड बातमीनं (Sonakshi Sinha Engagement Ring) चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

सोनाक्षीनं सोशल मीडियावर इंन्टाग्रामच्या अकाउंटवर तीन वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आपली एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करताना दिसत आहे. फोटोमध्ये तिच्या मिस्ट्रीमॅननं (Sonakshi Sinha Boyfriend Name) तिचा हात धरला असल्याचं दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ती जोडीदाराच्या खांद्यावर हात ठेवून पोज देताना दिसत आहे.

दरम्यान, फोटोखाली (Sonakshi Sinha Instagram Photo) कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की, ‘हा माझ्यासाठी मोठा दिवस आहे. माझं एक सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण होणार आहे. ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्यापासून मी स्वत:ला थांबवू शकत नाहीये.’ तसेच तिनं अद्याप तिच्या जोडीदाराचा चेहरा उघड केला नाहीये.

 

Web Title : Sonakshi Sinha Engagement Ring | sonakshi sinha shared photo with engagement ring on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा