Sonia Gandhi Birthday | सोनीया गांधी वाढदिवसानिमित्त ‘जुडेगा भारत, जितेगा इंडिया’ या संकल्पनेच्या माध्यमातून यंदाचा सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह

माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण उदघाटक; सुषमा अंधारे,सक्षणा सलगर प्रमुख पाहुण्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sonia Gandhi Birthday | अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा खासदार सोनीया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा,कर्तव्य आणि त्याग सप्ताह दि. २ ते १०डिसेंबर २०२३ या कालावधीत साजरा होत असून, सप्ताहाचे उदघाटन महाराष्ट्राचे माजी मुख्य मंत्री, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार असून, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे,राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. (Sonia Gandhi Birthday)

ही माहिती सप्ताहाचे मुख्य संयोजक, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi) यांनी पत्रकार परिषदेत दिली. उदघाटन सोहळा शनिवार,दि.२ डिसेंबर एस . एम.जोशी सभागृह येथे सायंकाळी साडेपाच वाजता होईल. ‘जुडेगा भारत, जितेगा इंडिया’ या संकल्पनेच्या माध्यमातून यंदाचा सप्ताह साजरा होत असून उदघाटन प्रसंगी मान्यवर भाष्य करतील. तसेच गांधी,नेहरू आणि आंबेडकर यांचा भारत विषयावर सप्ताहात व्याख्यान आयोजित केले जाणार आहे. (Sonia Gandhi Birthday)

सेवा,कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचा उदघाटन सोहळा महाराष्ट्राच्या राजकारणात उत्सुकतेचा ठरलेला आहे. विविध विचारवंत, प्रमुख राजकीय नेते यांनी उदघाटन सोहळ्यात केलेली भाषणे राजकारणात गाजलेली असून, त्यावर प्रदीर्घ काळ चर्चा होत राहिली आहे. यंदाचा सोहळाही वैचारिकदृष्ट्या संस्मरणीय ठरेल, असा विश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केला.

सोनिया गांधी यांनी पंतप्रधान पदाचा त्याग केला आणि जनतेच्या प्रति सेवाभाव ठेवून निष्ठेने कर्तव्य पार पाडत आहेत. याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २००४ सालपासून सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह काँग्रेसच्या वतीने साजरा करत असून यंदाचे १९ वे वर्ष आहे.

या सप्ताहात ससून मधील शवागारात काम करणाऱ्या कामगारांचा सत्कार, मुठाई नदी काल,
आज आणि उद्या या विषयावर खुला गट चित्रकला स्पर्धा,
रक्तदान शिबिर,महाआरोग्य तपासणी शिबिर,अनाथ आश्रम, वृद्धाश्रम,अंध शाळा
आदी ठिकाणी फळे,मिठाई,कपडे वाटप तसेच पद पथावर राहणाऱ्यांना 1 हजार ब्लँकेट वाटप,
महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा,महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर,सफाई महिला कर्मचारी सत्कार आणि साड्या ,
आरोग्य कीट वाटप केले जाईल.संविधान घर तयार करून त्यात प्रदर्शन भरविले जाईल.
प्रियदर्शनी इंदिरा विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे.शहराच्या विविध भागात हे उपक्रम राबविले जाणार आहेत,अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Sharad Pawar | अजित पवारांनी सांगितला पक्षफुटीचा पडद्यामागील घटनाक्रम, शरद पवारांवर केला ‘हा’ आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहरात बनावट ‘पॅराशूट’ तेलाची विक्री, व्यवसायिकावर गुन्हा

Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा लढवण्याची अजित पवारांची घोषणा, आव्हानानंतर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

Pune Crime News | कमी रकमेच्या वीजबिलासाठी परस्पर वीजमीटर बदलले, दोन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल