उध्दव ठाकरेंच्या शपथविधीला येण्याबाबत सोनिया गांधींनी घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज महाविकासआघाडी सत्तास्थापन करेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहावे यासाठी खुद्द आदित्य ठाकरे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीना आमंत्रण देण्यासाठी दिल्लीला गेले होते. परंतू आजच्या शपथविधीला सोनिया गांधींनी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंबंधित पत्र सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना लिहिले आहे. त्यात त्यांनी सांगितले की मी आज शपथविधीला उपस्थित राहू शकणार नाही. सोनिया गांधी पत्रात म्हणाल्या की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आपण अशा वेळी एकत्र आलो जेव्हा देशाला भाजपकडून मोठा धोका संभावत होता. परंतू मला दु:ख आहे की मी आज होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहू शकत नाही. परंतू या पत्रातून त्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

आज होणाऱ्या शपथविधीला उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, त्यांच्याबरोबर एकूण 6 नेते मंत्रिपदाची शपथ घेतील असे सांगण्यात आले होते परंतू काँग्रेसकडून कोण नेते मंत्रिपदाची शपथ घेणार याबाबत संभ्रम होता. परंतू यावरून पडदा उठला आहे. आता काँग्रेसकडून आज होणाऱ्या शपथविधीत काँग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत हे शपथ घेणार आहेत.

सुरुवातीला काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे आज मंत्रिपदाची शपथ घेतील असे सांगितले जात होते. परंतू आता काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Visit : Policenama.com