Latest Update on Saurav Ganguly Health : मुलगी सना गांगुली म्हणाली – ‘ते आता बोलत आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) च्या अँजिओप्लास्टी (Angioplasty) नंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. घरी जिम करताना दादांना चक्कर आले होते. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, आता त्यांची तब्येत सुधारत आहे आणि ते धोक्याच्या बाहेर आहेत.

मुलगी सनाने दिली माहिती
रुग्णालयात सौरव गांगुलींची भेट घेतल्यानंतर मुलगी सना गांगुली (Sana Ganguly) ने पत्रकारांना त्यांच्या प्रकृती बाबत सांगितले. वुडलँड्स हॉस्पिटलमधून बाहेर पडताना सना म्हणाली की आपण नंतर याबद्दल बोलू शकतो. पण गाडीत बसण्यापूर्वी सना म्हणाली की ते आता ठीक आहेत. ते बोलत देखील आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे.

अमित शहा यांनी केली विचारपूस
शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुली (Dona Ganguly) यांच्याशी संवाद साधला आणि सौरव गांगुलींची स्थिती जाणून घेतली. दादा सध्या कोलकाता (Kolkata) च्या वुडलँड्स रुग्णालयात (Woodlands Hospital) दाखल आहेत.

सीएम ममता बॅनर्जी यांनी घेतली भेट
पश्चिम बंगाल (West Bengal) च्या सीएम ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सौरव गांगुलीच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी वुडलँड्स रुग्णालयात दाखल झाल्या. बॅनर्जी यांनी माध्यमांना सांगितले, ‘ते आता ठीक आहेत. त्यांनी माझ्या आरोग्याबद्दलही विचारपूस केली. मी रुग्णालयातील अधिकारी व डॉक्टरांची आभारी आहे.’