Coronavirus : खळबळजनक ! ‘कोरोना’ मुळं स्पेनच्या फुटबॉल टीमच्या अवघ्या 21 वर्षीय प्रशिक्षकाचा मृत्यू

 पोलीसनामा ऑनलाईन टीम – जागतिक महामारी कोरोना व्हायरसमुळं स्पेनच्या फुटबॉल टीमचा कोच फ्रान्सिस्को ग्रासिया (Francisco Garcia) याचं निधन झालं आहे. फ्रान्सिस्को ग्रासिया केवळ 21 वर्षांचा होता. त्यानं आता जगाचा निरोप घेतला आहे. फ्रान्सिस्को नशॅनल टीम नाही तर युथ टीमचा मॅनेजर होता.

2016 पासून फ्रान्सिस्को Atletico Portada Alta च्या युवा टीमचा मॅनेजर होता. गोल डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, त्या क्षेत्रात तो सर्वात कमी वयाचा कोरोनाग्रस्त व्यक्ती होता. Atletico Portada Alta नं एक अधिकृत स्टेटमेंट सोशल मीडियावरून शेअर केलं आहे. यात असं सांगण्यात आलं आहे की, फ्रान्सिस्को गार्सियाचं निधन झालं आहे. फ्रान्सिस्कोच्या मृत्यूच्या बातमी नंतर सर्वत्र खळबळ उडाली असून आता लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसत आहे.

एटलेटिको पोर्टाडा अल्टानं (Atletico Portada Alta) सोशलवर लिहिलं की, “आम्ही ग्रासिया च्या प्रति शोक व्यक्त करतो. दुर्दैवानं आपले कोच फ्रान्सिस्को ग्रासिया यांचं आज निधन झालं आहे.” टीमनं सोशलवरून असाही संदेश दिला की, फ्रान्सिस्कोनं टीमसाठी जे काही केलं आहे ते कोणीच विसरू शकत नाही. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.

फ्रान्सिस्को कोरोना पॉझिटीव असल्याचं गेल्याच आठवड्यात समोर आलं होतं. यानंतर त्याला मालागा (Malaga) च्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं. कोरोनासोबतच तो लुकेमिया(Lukemia) या आजारानंदेखील ग्रस्त होता. कोरोनामुळं स्पेन फुटबॉल लीगही थांबवण्यात आली होती.