SSC HSC Exam 2022 | 10 वी-12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – SSC HSC Exam 2022 | वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Coronavirus) सध्या शाळा, काॅलेज (School, College) बंद करण्यात आली आहे. मागील कोरोनाच्या महामारीत दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. दरम्यान यंदा 10 वी आणि 12 वीची परीक्षा (SSC HSC Exam 2022) ऑफलाईनच होणार असल्याचं महत्वाचं विधान राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी बुधवारी केलं आहे.

 

 

वर्षा गायकवाड म्हणाल्या, ”राज्य शिक्षण मंडळाच्या 10 वीच्या लेखी परीक्षा या ऑफलाईनच होतील, त्यात कोणताही तुर्तास बदल होणार नाही. असं वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचा (HSC Exam 2022) अभ्यास आणि त्याची तयारी करावी, असं आवाहन देखील त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना केलं आहे.

 

 

कोरोनाच्या परिस्थितीमुळे पालक संघटनेकडून 10 वी आणि 12 वीच्या बोर्डाच्या लेखी परीक्षा ऑनलाईन घ्या अशी मागणी होत आहे. (SSC Exam 2022) यावरून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना विचारलं असता त्यावेळी त्या म्हणाल्या, ”कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव राज्यात कमी होत असल्याने लवकरच शाळा सुरू केल्या जाणार आहेत. तर दुसरीकडे 10 वी- 12 वीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होऊन त्यासाठीची तयारी करता यावी म्हणून शालेय शिक्षण विभागाकडून वेळोवेळी खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे या दोन्ही वर्गांच्या तोंडी, प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा या ऑफलाईनच होतील,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

 

Web Title :- SSC HSC Exam 2022 | ssc hsc exam 2022 update exam offline information of varsha gaikwad

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

 

हे देखील वाचा

 

 

Lata Mangeshkar | लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा; लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

 

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3500 पेक्षा अधिक नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Dolly Khanna Portfolio | डॉली खन्ना यांचे ‘हे’ स्टॉक ठरले कुबेराचं धन; 6 महिन्यामध्ये अडीच पट रिफंड

 

Pune Crime | सुरक्षा रक्षक बनले ‘देवदूत’, डॉ. सतीश चव्हाण यांच्या अपहरण झालेल्या ‘स्वर्णव’ला सुखरुप पोहचवलं पालकांकडे