‘त्या’ बडतर्फ कर्मचाऱ्याने मागितली मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची परवानगी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – चुकीच्या पद्धतीने कारवाई करून बडतर्फ केले. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे इतर चालकांप्रमाणे आपणासही सेवेत घ्यावे, अन्यथा कुटुंबासह आपणास इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे लेखी निवेदन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील बडतर्फ चालक शरद पोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविले आहे.

पोटे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘महामंडळाने २०१३ मध्ये अयोग्य व बेकायदेशीरपणे नोकरीतून बडतर्फ केले. त्याच गैरवर्तनाबाबत इतर ९ हजार २३४ वाहकांना वेतनवाढ थांबवून नोकरीत कायम ठेवले. एकाच प्रकरणात सारख्याच शिक्षा द्याव्यात, असे शासनाच्या परिपत्रकात नमूद आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेदभाव करून मला सेवेतून बडतर्फ केले. महामंडळाकडे आपण वेळोवेळी लेखी मागणी करून न्याय मागितला. मात्र अद्याप दखल घेतली गेली नाही. नोकरी नसल्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मला कुटुंबियांसह इच्छामरणाची परवानगी द्यावी.’

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like