ST Worker Strike | दुर्देवी ! संपाच्या तणावातून ST चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; प्रचंड खळबळ

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या राज्यात एसटी महामंडळाचा संप (ST Worker Strike) चालू आहे. त्यातच आता एसटी विभागातील मेढा आगारातील (Medha Bus Depot) बसचालक संतोष वसंत शिंदे (Santosh Vasant Shinde) यांचा हृदय विकाराच्या झटक्यानं (Heart Attack) मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप (ST Worker Strike) सुरू आहे. या संपावर राज्य सरकारकडून अजून कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही.

 

यामुळे राज्यातील सर्व एसटी कर्मचारी प्रचंड तणावा खाली आहेत. बसचालक संतोष शिंदे हेसुद्धा मागच्या चार ते पाच दिवसांपासून संपामुळे प्रचंड तणावाखाली होते. याच तणावामुळे काल त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संतोष शिंदे यांच्या माघारी दोन मुले, पत्नी व आई-वडील असा परिवार आहे. असे अनेक किती संतोष जाण्याची राज्य सरकार वाट पाहत आहे, असा सवाल जनतेकडून विचारण्यात येत आहे.

एसटी महामंडळ (MSRTC) तत्काळ शासनात विलीन करावे, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. कालच संपकाळातील (ST Worker Strike) प्रवासी वाहतुकीच्‍या कारणावरुन सातारा आगारात कर्मचाऱ्यांच्‍या दोन गटात मोठा वाद झाला होता. या वादामध्ये डोक्याला दगड लागल्याने सातारा आगारातील वाहतूक नियंत्रक अमित चिकणे (Amit Chikne) हे जखमी झाले होते.

 

Web Title :- ST Worker Strike | ST Workers strike santosh shinde dies of heart attack at medha depot satara district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Primary Schools Reopen | राज्य सरकारकडून पहिलीपासूनच्या शाळा लवकरच सुरू करण्याचे संकेत

Petrol-Diesel Price Cut | राजस्थान सरकारनेही इंधनावरील व्हॅट केला कमी; महाराष्ट्रात इंधनाचे दर कमी कधी होणार?

Pune Crime | पुण्यात 20 लाखांच्या कर्जाचे वसुल केले 1 कोटी; परतफेड केल्यानंतरही बायको-मुलीला धंद्याला लावण्याची धमकी; बेकायदा सावकारी करणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

PM Kisan | खुशखबर ! यावेळी शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये 2000 ऐवजी जमा होती 4000 रूपये, इथं यादीत तपासून घ्या तुमचं नाव

Guavas Benefits | वजन कमी करा, खोकला-सर्दीपासून बचाव करा, थंडीमध्ये पेरू खाण्याचे ‘हे’ आहेत असंख्य फायदे

Mumbai Police | कौतुकास्पद ! नाल्यातून वाहत जात होतं ‘नवजात’ बाळ, ‘म्याव-म्याव’ करून मांजरांनी केलं अलर्ट, मुंबई पोलिसांनी अर्भकाला वाचवलं

Pune Crime | पुण्यात सुप्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध पत्नी आणि अभिनेत्री स्नेहा यांच्याकडून कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल