ST Workers Strike | राज ठाकरे यांच्याकडून शरद पवार यांच्याकडे ‘ही’ मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे यासाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर (ST Workers Strike) आहेत. दरम्यान, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers Strike) मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेऊन यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. त्यानंतर राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहे. त्यांनी आज एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सिल्व्हर ओक (Silver Oak) या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. जवळपास एक तास ही भेट सुरु होती.

 

या भेटीत राज ठाकरे यांनी एसटी संपाबाबत तोडगा काढण्याची विनंती शरद पवार यांच्याकडे केली. तसेच एसटी महामंडळाला सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्र्यांवर (CM) शस्त्रक्रिया (Surgery) झाल्याने राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शरद पवार आणि राज ठाकरे लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी दिली.

 

 

शरद पवार आणि राज ठकारे यांच्या झालेल्या चर्चेची माहिती बाळा नांदगावकर यांनी माध्यमांना दिली. या भेटीत केवळ एसटी प्रश्नावर (ST Workers Strike) चर्चा झाली. शरद पवार तोडगा काढतील अशी अपेक्षा आहे, अशी माहिती त्यांनी दिली. एसटी कर्मचाऱ्यांचा गंभीर विषय असल्याने राज ठाकरे यांनी लगेच शरद पवार यांची भेट घेतल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) लागू केल्यास एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ होईल, आणि ते संप मागे घेतली अशी मागणी राज ठाकरे यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title :- ST Workers Strick | MNS raj thackeray met sharad pawar on the issue of st workers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा