मुंबईराजकीय

ST Workers Strike | एसटी कर्मचारी आक्रमक ! शरद पवारांच्या ‘सिल्वर ओक’मध्ये घुसून चप्पल फेक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ST Workers Strike | आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष (NCP Chief) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईमधील निवासस्थानी बाहेर संपकरी कामगारांनी (ST Workers Strike) गोंधळ घातला आहे. एसटी कामगारांनी (MSRTC Workers) शरद पवार यांच्या सिल्वर ओक (Silver Oak) निवासस्थानी घुसून चप्पल फेक (Chappal Fake) देखील केली आहे. त्यामुळे हा एसटी कामगारांचा (ST Employees News) वाद आता थेट शरद पवार यांच्या घर परिसरात चिघळला असल्याचं दिसत आहे.

 

एसटी कामगारांनी गेल्या अनेक महिन्यापासून राज्यभर संप केल्याने कोर्टाच्या आदेशाने कालच संप मिटला असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आज (शुक्रवारी) एसटी कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे दिसत आहे. आज थेट शरद पवार यांच्या घरासमोर एसटी कामगारांनी गोंधळ घातला असून आणखी वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिली आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना कामावर परत घेण्याची ग्वाही न्यायालयात दिली आहे. त्यानंतर कोर्टाने 22 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी एसटी कामगारांच्या संप विरोधात एसटी महामंडळाचा अवमान याचिकेवर हाय कोर्टात सुनावणी झाली होती.

Web Title : ST Workers Strike | MSRTC workers strike st employees karmachari
attack on sharad pawar home silver oak chappal fake news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क

 

Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत ‘डिजिटल कार्यकर्त्यां’मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

Back to top button