चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल, म्हणाले – ‘सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी राज्य सरकारचे नाते’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ते म्हणतात, सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी राज्य सरकारचे नाते जोडले गेले आहे. सत्ताधाऱ्यांनी शिवशाहीऐवजी केवळ ठोकशाही पद्धतीने राज्य चालविण्यास सुरुवात केली आहे, असे ते म्हणाले. त्यावेळी ते रविवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यातील एक मंत्री अनैतिक संबंधाबद्दलची कबुली देतो. दुसऱ्या एका मंत्र्याचे नाव तरुणीच्या आत्महत्येशी जोडले जाते. ड्रग प्रकरणातही दिग्गज नेत्याच्या पुत्राचे नाव चर्चेत येते. एका मंत्र्याच्या बंगल्यात तरुणाला मारहाण केली जाते. अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सरकारमधील मंत्री व त्यांचे नातलग बदनाम होत असताना सरकार त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी दडपशाहीचे दर्शन घडवीत आहे. राज्यामध्ये जे काही चालले आहे, ते राज्याच्या प्रतिमेला तडा देणारे आहे. तसेच निष्क्रियतेचीही सरकारने परिसीमा गाठली आहे. कोरोनाच्या उपाययोजनांवर एक रुपयाचाही खर्च राज्य सरकारने केला नाही. पीपीई किटपासून लसीकरणापर्यंतचा सर्व खर्च केंद्र सरकारने केला आहे. त्यामुळे राज्य सरकारला केंद्राकडे बोट करण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, पुढे पाटील म्हणाले, राज्य सरकारने शेतकरी, महिला, मजूर, कामगार, कर्मचारी यांच्यासाठी काय केले, हे जाहीर करावे. सरकारची सध्याची अवस्था ही ‘नाचता येईना, अंगण वाकडे’ अशी झाली आहे. असे ते म्हणाले, तसेच पाटील यांनी शरद पवार याना उद्देशून बोलले आहे कि ते म्हणतात शरद पवारांना माझ्याशिवाय करमत नाही. मी त्यांच्याविषयी काही बोललो नाही, तरी ते माझ्याविषयी काही तरी बोलत असतात. त्यांनी राज्यातील बदनाम मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे. त्यांना आम्ही परिपक्व नेते म्हणतो. तरीही ते काही कारवाई करीत नाहीत, असेही चंद्रकांत पाटील यांनी त्यावेळी म्हटले आहे.