‘अंडरग्राउंड’ हार्दिक पटेलचा पोलिसांकडून ‘शोध’ सुरू, पत्नी ‘किंजल’ नं सोशल मीडियावर सांभाळला ‘मोर्चा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरक्षण चळवळीच्या दरम्यान पाटीदार नेते हार्दिक पटेल यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईमुळे हार्दिक पटेल भूमिगत झाल्याचे समजते. त्याची पत्नी किंजल यांनी सोशल मीडियावर मोर्चा सांभाळत गुजरात सरकार आणि पोलिसांवर अनावश्यक छळ केल्याचा आरोप केला आहे.

पाटीदार आरक्षण आंदोलनातून कॉंग्रेसचे युवा नेते बनलेल्या हार्दिक पटेल याची पत्नी किंजल पटेल गेल्या काही दिवसांपासून हार्दिकच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत गुजरात सरकार आणि पोलिसांवर आरोप करत आहेत. २९ जानेवारी रोजी किंजल यांनी लिहिले की, ‘काही दिवसांपूर्वी तुरूंगातून सुटल्यानंतरही हार्दिक घरी पोहोचले नाही. अहमदाबाद गुन्हे शाखेचे अधिकारी व सैनिक घरी येतात आणि रात्री दहा वाजता हार्दिक घरी नसल्याची माहिती देऊनही जबरदस्ती घराची झडती घेतात. याआधी, किंजल यांनी लिहिले कि, ‘कोणाला मारणे म्हणजे दहशतवाद नसतो, एखाद्याला धमकावून कोपऱ्यात बसविण्याचा प्रयत्न करणे हादेखील दहशतवाद आहे.

याआधी २४ जानेवारीला सुटका झाल्यांनतर हार्दिकने ट्विट केले की, ‘७ दिवसानंतर हुकूमशाहीतून मुक्त झालो आहे, माझा काय गुन्हा आहे, मी शेतकरी, तरुण, विद्यार्थी आणि शिक्षण आणि रोजगाराच्या हक्कांबद्दल बोलतो त्यामुळे मी त्यांच्या निशाण्यावर आहे.’ तसेच आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये हार्दिक लिहितो की, मी न्याय आणि कायदा व सुव्यवस्थेचा आदर करतो पण कधीकधी इथेही निराशा जाणवते. हार्दिकविरुद्ध अहमदाबाद सत्र न्यायालय किंवा मोरबीच्या टँकारा न्यायालयातून वॉरंट जारी करण्यात आले आहे, पोलिस सातत्याने त्याचा शोध घेत आहेत पण हार्दिक काही दिवस भूमिगत झाला आहे.

किंजल पटेल गेल्या एक महिन्यापासून हार्दिकचे ऑफिशिअल ट्वीटर हॅण्डल हाताळत आहेत. त्या लिहितात कि, हार्दिक सांगत असतात कि, समाजासाठी कितीही काम करा, जेव्हा वेळ येते तेव्हा लोक विसरतात. किंजल सांगतात की, आम्ही चळवळीतून कोणतेही पैसे मिळवले नाहीत, आपण करोडपती झालो नाही, हार्दिकने निर्दोषपणे काम करतो, पण आज लोक त्याच्या पाठीशी उभे असल्याचे दिसत नाही. मौन बसणे हा एक अन्याय आहे, आम्ही मजबूत आहोत आणि आमच्या हक्कांसाठी पूर्ण ताकदीने लढा देत राहू.’