Stock Market | नववर्षाच्या पहिल्याच दिवशी निर्देशांकाची उसळी; गुंतवणूकदारांना दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Stock Market | काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या वाढू लागली आहे. कोरोनाच्या संकटातच नववर्षाचे स्वागत करण्यात आले. दुसरीकडे शेअर बाजारातील (Stock Market) गुंतवणूकदारांमध्ये (Investors) भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्सने (Sensex) उंच उडी घेतली आणि निफ्टी वर झेपावत राहिल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या रुग्ण संख्या वाढीचा कोणताही परिणाम शेअर बाजारावर झाला नसल्याचे दिसत आहे.

मुंबई शेअर बाजारात (Mumbai Stock Exchange) संवेदनशील निर्देशांक हा वाढीव पातळीवर खुला झाला. त्यामध्ये वाढ होत तो 59,266 अंशांपर्यंत वर गेला. त्यानंतर बंद होताना निर्देशांक 59,183.22 अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकांचा विचार केल्यास यामध्ये 929.40 अंशांची वाढ झाली. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजारातील निर्देशांकमध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली. दिवसभरात 271.65 अंशांची वाढ झाली. तर बाजार बंद होताना निर्देशांक 17,625,90 अंशांवर बंद झाला. (Stock Market)

बॅक निफ्टीमध्ये चांगली तेजी –

बँकांच्या निफ्टीमध्येही चांगली तेजी पाहायला मिळाली. बजाज फिनसर्वच्या शेअरमध्ये झालेल्या तेजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ॲक्सिस (Axis), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि आयसीआयसीआय (ICICI) या तीन बँकांचे शेअरही वधारले. ऑटो क्षेत्रातही समाधानाचे वातावरण होते. मारुतीचा शेअरनेही चांगली उंची गाठली.

 

आयटी क्षेत्रासाठी सुगीचे दिवस –

विप्रो, लार्सन अँण्ड ट्रुबो, एशियन पेंट्स आणि टेक महिंद्राच्या शेअर दरात चांगली वाढ झाली. टीसीएस (TCS), पॉवर ग्रीड (Power Grid), एचसीएल टेक (HCL Tech), इन्फोसिस एनटीपीसी (Infosys NTPC) यांच्या शेअरमध्ये सुमारे एक टक्का वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, आयनॉक्स आणि पीव्हीआर यांनी मार खाल्ला.

Web Title : Stock Market | happy new year in stock market investors get big relief

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी