‘या’ क्षेत्रात गुंतवणूक केल्यास तुम्ही व्हाल ‘करोडपती’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बाजारातील दिग्गजांचे मानणे आहे की पैसे कमावण्याची कल्पना तुमच्याकडेच आहे. मागील दहा वर्षांपासून दलाल पथ वर पाणी त्यासंबंधित सप्लाय करण्याऱ्या कंपन्यांची चलती आहे आणि येणाऱ्या काळात हे सुरुच राहिल. सरकार कोट्यावधी घरात पाण्याचा सप्लाय देण्याची मोठी योजना राबवत आहे. सरकारने आपल्या ‘नल से जल’ या योजनेसाठी 3.5 लाख कोटी रुपयांचे बजट ठेवले आहे.

एमके ग्लोबल फायनेंशिअल सर्विसेजच्या मते 2024 पर्यंत सर्व घरात पाणी पोहचवण्याचे लक्ष्य असल्याने या क्षेत्राला मिळणारी पसंती वाढली आहे. या क्षेत्रात गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. ब्रोकरेजने सांगितले की, आमचा अंदाज आहे की आर्थिक वर्ष 2020 ते 2024 दरम्यान पाण्यावर $70 अरबचा खर्च होणार आहे. जर जास्त कालावधीचा विचार केला तर 2020 ते 2050 दरम्यान $262 अरब पर्यंत खर्च करण्यात येऊ शकतो. या संंबंधित कंपन्यांनी बंपर परतावा देण्यास सुरुवात केली आहे.

उदाहरणार्थ, तुम्ही जर 10 वर्षांपूर्वी पॉली टेकनिकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आज त्याची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 25 सप्टेंबर 2009 ला या शेअरची किंमत 10.20 रुपये होती जी 26 सप्टेंबर 2019 ला 1,157 रुपयांपर्यंत पोहचली आहे.

एका दशकात नफा कितीतरी पट वाढला आहे. मार्च 2019 ला संपलेल्या आर्थिक वर्षात एस्ट्रल पॉली टेकनिकने 201 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट दाखवला. आर्थिक वर्ष 2008 ते 2009 मध्ये कंपनीने 14 कोटी रुपयांचा नफा कमावला.

या दरम्यान उप्तादक कंपन्या जसे की सुप्रीम इंडस्ट्रीज, फिनोलेक्स, रत्नमण मेटल अॅण्ड ट्यूब्स, श्रीकलाहस्ती पाइप्स, टाटा मेटालिक्स आणि केएसबीच्या शेअरने देखील 230 टक्कांवरुन 1,850 टक्कांपर्यंत उचल खालली. IDBI कॅपिटल मार्केट्सचे संशोधन प्रमुख एके प्रभाकर यांनी सांगितले की, जर फोकस पाण्यावर आहे तर निश्चित आहे की कंपन्यांना फायदा मिळेल. सुप्रीम आणि फिनोलेक्स आमच्या प्रमुख पसंतीच्या कंपन्या आहेत. सध्याच्या वेळी एस्ट्रल पॉली खूपच महागला आहे.

अर्थिक वर्ष 2018 – 19 दरम्यान फिनोलेक्सने 350 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. तर आर्थिक वर्ष 2008 ते 2009 साली हा नफा फक्त 38 कोटी रुपयांचा होता. 2017-18 साली 299 कोटी, 2016 – 17 साली 352 कोटी रुपये असा नेट प्रॉफिट राहिला.

असे नाही की सर्वच शेअर्सला यश मिळत आहे. 2009 साली किर्लोस्कर ब्रदर्सचे शेअर 22 टक्के होते, जिंदल सॉ चे शेअर 42 टक्के तर वेलस्पन कॉर्पोरेशनचे शेअर 46 टक्के होते.

2018 – 19 या आर्थिक वर्षात किर्लोस्करला 5.20 कोटी रुपये नेट लॉस झाला तर एक वर्षांपूर्वी 47 कोटी रुपये नफा झाला.  2008 – 09 साली कंपनीने 83 कोटी रुपयांचा नफा कमावला, तर एका दशकात वेलस्पन कॉर्पोरेशनचा नफा 213 कोटी रुपयांवरुन 63 कोटी रुपयांवर आला.

एमके यांनी सांगितले की, पाण्यासाठी इंफ्रास्ट्रक्चर बनवल्याने अत्यंत फायदा होईल. परंतू यासाठी आर्थिक वर्ष 2020 ते 2024 अत्यंत महत्वाचे असणार आहेत. ब्रोकरेज नुसार इंजिनिअरिंग, कंस्ट्रक्शन, पाइप आणि पंप कंपन्यांना विशेष लाभ होईल, ज्यात पाइप आणि पंपाला विशेष महत्व असेल.

Visit : Policenama.com