चालकाला मारहाण करुन १० लाखाचे स्पेयर पार्ट चोरले

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – कंटेनर चालक आणि सहकाऱ्याला मारहाण करून जबरदस्तीने कंटेनर मधील १० लाख रुपयांचे वाहनांचे स्पेअरपार्ट चोरुन नेल्याची घटना नाशिक-पुणे रोडवर कुरुळी गावाजवळ स्पायसर चौकात घडली.
या प्रकरणी कंटेनर चालक सुभाष निवृत्ती कांबळे (५७, रा. लोणीकंद, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. तर अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे हे त्यांचे सहकारी योगेश नीरज द्विवेदी याच्यासोबत मंगळवारी पहाटे त्यांच्या कंटेनर (एम एच 12 / एच डी 4349) मध्ये वाहनांचे स्पेअर पार्ट घेऊन निघाले होते. नाशिक-पुणे महामार्गावर कुरुळी गावच्या हद्दीत स्पायसर चौकात आले असता दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यानी कंटेनरला दुचाकी आडवी लावून कंटेनर थांबवला. कांबळे यांचा सहकारी योगेश याला कंटेनरच्या बाहेर ओढून लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच कांबळे यांनाही मारहाण केली. कंटेनर म्हाळुंगे रोडवरील टिव्हीएस कंपनीजवळ नेऊन कंटेनर मधील १० लाख रुपयाचे वाहनांचे स्पेअर पार्ट एका टेम्पोमध्ये भरून जबरदस्तीने चोरुन नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.