5 गर्लफ्रेंड्स असलेल्याचा प्रताप पाहून पोलिस देखील झाले अवाक्

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन –  पाच गर्लफ्रेंडची हौस भागवण्यासाठी मोबाइल चोरी करणाऱ्या एका चोराला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. या चोरांकडून पोलिसांनी दहा मोबाइल जप्त केले आहेत. हा चोर एक साथीदाराच्या साहाय्याने मोबाइल हिसकावून पळून जायचा.

मागील काही दिवसांपासुन कल्याण डोंबिवली भागात मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. हे चोर अ‍ॅक्टिव्हा स्कुटरवरुन येत व लोकांच्या हातातील मोबाइल हिसकावून पसार व्हायचे. तेव्हाच कल्याण पश्चिम मध्ये वालधुनी परिसरात एका तरुणाचा मोबाइल हिसकावून चोरी झाल्याची घटना घडली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. याच्या आधारे कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यातील अधिकारी प्रकाश पाटील यांनी तपास सुरु केला होता.

शेवटी तपासादरम्यान पोलिसांनी या चोरट्याला पडकण्यात यश आले. या प्रकरणी भिवंडीतील नांदेडकरमध्ये राहणाऱ्या मोबाइल चोर निखिल याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पोलिसांनी दहा मोबाइल हस्तगत केले. त्यात कल्याणमधील तीन घटना उघडकीस आल्या. तर अन्य मोबाइल त्याने कुठून चोरले याचा तपास सुरु आहे. तद्वतच, त्याच्या एका साथीदाराचा शोध देखील पोलीस घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, निखिल याला पाच गर्ल फ्रेंड आहेत. तो त्याच्या प्रत्येक गर्लफ्रेंडची हौस भागवत असून, त्याच्याकडे खूप पैसा आहे. हे दाखवण्यासाठी निखिलने मोबाइल चोरीचा धंदा सुरु केला होता. शेवटी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

You might also like