Stomach Ulcer | धोकादायक होऊ शकतो पोटाचा अल्सर, ‘या’ लक्षणांद्वारे ओळखू शकता; जाणून घ्या घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Stomach Ulcer | बदलत्या जीवनशैली (Lifestyle) चा सर्वात जास्त परिणाम आपल्या आरोग्यावर झाला आहे. चुकीच्या आहारामुळे अनेक आजारांनी आपल्या शरीराला घेरले आहे, त्यातील एक अल्सर (Ulcer) आहे. पेप्टिक अल्सर, गॅस्ट्रिक अल्सर, ड्युओडेनल अल्सर आणि एसोफेजियल अल्सर (Peptic Ulcer, Gastric Ulcer, Duodenal Ulcer, Esophageal Ulcer) असे अनेक प्रकारचे अल्सर (Stomach Ulcer) आहेत. (Stomach Peptic Ulcers Treatment)

 

यापैकी एक म्हणजे गॅस्ट्रीक म्हणजेच पोटाचा अल्सर (Stomach Ulcer) जो खूप धोकादायक आहे. पोटातील अतिरिक्त अ‍ॅसिड (Acid) हे गॅस्ट्रिक अल्सरचे मुख्य कारण असू शकते. यावर वेळीच उपचार न केल्यास कोलन कॅन्सरही (Colon Cancer) होऊ शकतो. पोटात अल्सर म्हणजे काय, त्याची लक्षणे (Symptoms) आणि प्रतिबंधासाठी घरगुती उपाय जाणून घेऊया.

 

पोटाचा अल्सर म्हणजे काय (What Is Stomach Ulcer)?
पोटातील लहान आतड्याच्या म्यूकल झालरीवर जखम किंवा फोडांच्या समस्येला गॅस्ट्रिक अल्सर म्हणतात. हा पोटात जास्त प्रमाणात अ‍ॅसिडचे प्रमाण, धूम्रपान (Smoking) किंवा ड्रग्सचे (Drugs) सेवन, स्टिरॉइड्सचे जास्त सेवन, अनुवांशिक घटक, जास्त ताण आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे होऊ शकतो. याशिवाय हेलिकोबॅक्टर पायलोरी (Helicobacter Pylori) नावाच्या बॅक्टेरियाचा संसर्ग हे देखील पोटात अल्सर होण्याचे एक प्रमुख कारण आहे.

 

पोटातील अल्सरची लक्षणे (Symptoms Of Stomach Ulcer)
खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोटात अ‍ॅसिड तयार होते. पोटात असलेले अ‍ॅसिड अन्ननलिकेत वरच्या दिशेने येते, ज्यामुळे छातीत जळजळ होते. यासोबतच लोकांना अनेकदा पोट फुगण्याची समस्याही असते. हे पोटात अल्सरचे लक्षण देखील असू शकते. याशिवाय वारंवार उलट्या (Vomiting) होणे हे देखील पोटातील अल्सरचे लक्षण असू शकते.

याशिवाय उलटीमधून रक्त येणे हे देखील त्याचे लक्षण असू शकते. त्याच वेळी, अचानक वजन कमी (Weight Loss) होणे हे देखील पोटातील अल्सरचे लक्षण आहे. वारंवार भूक लागणे किंवा दिवसातून अनेक वेळा खाणे हे देखील अल्सरचे लक्षण आहे.

 

रात्री, रिकाम्या पोटी किंवा खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने तीव्र वेदना
गॅस (Gas) आणि ढेकर (Burping) येणे
उलट्या होणे
पोटाच्या वरच्या भागात दुखणे
पोटात जडपणा
भूक न लागणे
वजन कमी होणे
पहाटे सौम्य मळमळ

 

अल्सरच्या समस्येत काय खावे (What To Eat In Ulcer)?
फ्लॉवर (Cauliflower) आणि कोबीच्या (Cabbage) वापरामुळे अल्सरची समस्या टाळता येते. याशिवाय अल्सर डाएट चार्टमध्ये (Ulcer Diet Chart) मुळ्याचा (Radish) समावेश करणेही फायदेशीर ठरू शकते. यासोबतच सफरचंद (Apple), ब्लूबेरी (Blueberries), रास्पबेरी (Raspberry), ब्लॅक बेरी (Blackberry), स्ट्रॉबेरी (Strawberry) फायदेशीर आहे.

 

घरगुती उपाय (Home Remedies)
बेलाचा रस (Bael juice) किंवा बेलपत्राचा रस पोटाच्या अल्सरमध्ये फायदेशीर आहे.
पोटाच्या अल्सरमध्ये केळी (Banana), नारळ (Coconut), कोबी, गाजर, मेथी (Fenugreek) यांचे सेवन करावे.
पोटाच्या अल्सरसाठी जास्वंदीची लाल फुले बारीक करून पाण्यात सरबत बनवून प्यायल्याने फायदा होतो.
गाईच्या दुधात (Cow’s Milk) थोडी हळद (Turmeric) मिसळून रोज प्यायल्यास पोटाच्या अल्सरमध्येही फायदा होतो.

अल्सर बरा होऊ शकतो का (Can An Ulcer Be Cured)?
हा आजार चुकीचा आहार आणि गॅस्ट्रिकच्या समस्येमुळे होतो. पेप्टिक अल्सरमुळे कॅन्सर होत नाही, मात्र गॅस्ट्रिक अल्सरमुळे कॅन्सर होऊ शकतो.
म्हणूनच वेळेत उपचार करणे महत्वाचे आहे. लवकर निदान झाल्यास अ‍ॅसिडच्या औषधांनी तो बरा होतो.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Stomach Ulcer | what are the warning signs of an ulcer stomach ulcer causes symptoms and diagnosis can ulcer be cured

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | मौजमजेसाठी 43 लाख चोरणाऱ्या रोखपालाला लोणीकंद पोलिसांनी गोव्यातून केली अटक

 

White Hair Problem | पांढरे केस होतील पूर्णपणे काळे, महागड्या प्रॉडक्ट्सऐवजी ‘या’ 2 पानांचा करा वापर

 

Gold-Silver Prices | जागतिक बाजारात दर घसरल्याने सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा नवीन दर