‘ड्रग्ज प्रकरणातील संशयित कलाकारांचं शुटींग थांबवा अन्यथा…’, रामदास आठवलेंनी दिला ‘हा’ इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   सुशांत सिंह प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर आता नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो या प्रकरणी तपास करत आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला अटक झाल्यानंतर दीपका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर अशी बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली आहे. यावरून आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कलाकारांना आणि निर्मात्यांना इशारा दिला आहे.

‘नाहीतर आरपीआयचे कार्यकर्ते शुटींग बंद पाडतील’

ड्रग्ज प्रकरणात नावं समोर आलेल्या कलाकारांना ब्लॅक लिस्ट करत चित्रपट निर्मात्यांनी त्यांना काम न देण्याचं आवाहन केलं आहे. जर निर्मात्यांनी तसं केलं नाहीतर आरपीआयचे कार्यकर्ते शुटींग बंद पाडतील असा सूचनावजा इशारा त्यांनी दिला आहे.

‘अभिनेत्रींप्रमाणेच अभिनेते, निर्माते अन् दिग्दर्शकांचीही नावं समोर यावीत’

रामदास आठवले असंही म्हणाले, “एनसीबीच्या पथकाकडू करण्यात आलेल्या तपासणीत एनसीबीचा खरा चेहरा समोर आला आहे. मात्र अभिनेत्रींप्रमाणेच अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकांचीही नावं समोर आली पाहिजेत. सोबततच सुशांतच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांची नावंही लवकरात लवकर समोर आली पाहिजेत” असंही ते म्हणाले आहेत.

‘दिशा सालियानच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा’

सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूचीही सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी आठवलेंनी केली आहे. दिशाच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांची संशयास्पद भूमिका असल्याचा दावाही त्यांनी केला. मुंबई पोलिसांनी कोणत्याही चौकशी व पुराव्यांशिवाय दिशानं आत्महत्या केल्याचं सांगितलं जे पूर्णपणे चुकीचं आहे. दिशाच्या मृत्यूच्या एक दिवसआधी तिला टॉर्चर करण्यात आलं होतं असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. दिशाचा मृत्यू 8 जूनला झाला तर सुशांतचा 14 जूनला. त्यामुळं दोघांच्या मृत्यूचा एकमेकांशी संबंध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

‘अनुराग कश्यपला अटक करा’

बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस पायल घोष हिनं डायरेक्टर अनुराग कश्यप यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर रामदास आठवलेंनी अनुराग कश्यपला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी केली आहे. तसं न झाल्यास पक्षाचे कार्यकर्ते ओशिवारा पोलीस ठाण्यात आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.