अलर्ट ! फॉर्म-16 चा मेल आला तर व्हा सावध,सायबर फसवणूकीचे होवू शकता ‘शिकार’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सायबर भामट्यांनी आता फॉर्म-16 च्या नावाने सुद्धा फसवणूक करण्यास सुरूवात केली आहे. अशा टोळ्यांकडून ई-मेलद्वारे सर्व लोकांना एकाच वेळी संपर्क केला जातो. एचआर विभागाकडून मेल पाठवला गेलाय, असे भासवण्यात येते. मेलवर क्लिक करताच लोकांची वैयक्तिक माहिती मागितली जाते. ई-मेल मध्ये सांगितले जाते की, आयकर विभागाने फॉर्म-16 साठी नवी व्यवस्था सुरू केली आहे, ज्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करा. एखाद्या व्यक्तीने लिंकवर क्लिक केल्यास त्याला अशा पेजवर नेले जाते जेथे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक डिटेल अशी सर्व माहिती मागितली जाते.

अशी पोहचते माहिती
देशाचे राष्ट्रीय सायबर सिक्युरिटी समन्वयक राजेश पंत म्हणाले, असे लोक संस्थेच्या नावाशी मिळते जुळते मेल पाठवतात. त्या लिंकवर क्लिक केल्यास सिस्टम हॅक होते, आणि सर्व माहिती या भामट्यांपर्यंत पोहचते. लिंक क्लिक करताच मोबाइल किंवा कम्प्यूटरमध्ये एखादा बग इन्स्टॉल होतो, जो पूर्ण सिस्टमची माहिती नंतर पाठवतो. अशावेळी व्यक्तीने बँकिंग व्यवहार केल्यास फसवणूक होऊ शकते.

असुरक्षित इंटरनेटचा फायदा घेतात
कोरोना महामारीमुळे अनेक संस्था ईमेलद्वारे लोकांना फॉर्म -16 पाठवत आहेत. महामारीमुळे वर्क फ्रॉम होम व्यवस्थेत लोकांच्या कमी सुरक्षित इंटरनेट आणि वायफाय सेवेचा फायदा हे ठग घेत आहेत.

आयकर विभागाचे आवाहन
आयकर विभाग आणि रिझर्व्ह बँकेने अशा लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे, कोणत्याही लिंकची खात्री झाली तरच क्लिक करा. आपली वैयक्तिक आणि बँकेशी संबंधीत माहिती कुणालाही देऊ नका. सायबर गुन्हेगार लोकांची माहिती डार्क वेबवर विकत आहेत. तेथून जगभरात पसरलेले सायबर भामटे लोकांना चूना लावत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like